Rajan Vichare VS Naresh Mhaske Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Politics : मोठी बातमी! शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांना मुंबई हायकोर्टाची नोटीस; नेमकं कारण काय?

Rajan Vichare Vs Naresh Mhaske : शिवसेना शिंदे गटाचे ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के गोत्यात येण्याची शक्यता आहे. कारण मुंबई हायकोर्टाने नरेश म्हस्के यांच्यासह ठाण्यातील 22 लोकसभा उमेदवारांना नोटीस धाडली आहे.

Satish Daud

शिवसेना शिंदे गटाचे ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के गोत्यात येण्याची शक्यता आहे. कारण मुंबई हायकोर्टाने नरेश म्हस्के यांच्यासह ठाण्यातील 22 लोकसभा उमेदवारांना नोटीस धाडली आहे. एका प्रकरणात दोषी असताना देखील नरेश म्हस्के यांनी लोकसभेची निवडणूक लढवली, असा आक्षेप घेत ठाकरे गटाचे माजी खासदार राजन विचारे यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे.

दोषी असताना देखील नरेश म्हस्के यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात दोषी नसल्याचा उल्लेख केला. ही निवडणूक आयोगाची दिशाभूल आहे. त्यामुळे त्यांची खासदारकी तातडीने रद्द करावी, अशी मागणीही राजन विचारे (Rajan Vichare) यांनी या याचिकेतून केली आहे. दरम्यान, या याचिकेची दखल घेत मुंबई हायकोर्टाने खासदार नरेश म्हस्के यांच्या 22 लोकसभा उमेदवारांना नोटीस पाठवली आहे.

आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 2 सप्टेंबरला होणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी ठाणे लोकसभा मतदारसंघातून राजन विचारे यांचा पराभव केला होता. एकनाथ शिंदे यांचा हा बालेकिल्ला असल्याने या मतदारसंघाकडे सर्वांचंच लक्ष लागून होतं.

ठाण्याच्या जागेवर एकनाथ शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. अखेर अटीतटीच्या लढाईत नरेश म्हस्के यांनी राजन विचार यांचा मोठ्या मताधिक्यांनी पराभव केला. हा पराभव शिवसेना ठाकरे गटाच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. त्यामुळेच नरेश म्हस्के यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेत राजन विचारे यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे.

'ठाकरे गटाचे दोन खासदार शिंदेंच्या संपर्कात'

दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे लोकसभेत निवडून आलेले 9 पैकी 2 खासदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा, खासदार नरेश म्हस्के यांनी केला होता. त्यांच्या या दाव्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. "ठाकरे गटाच्या या दोन खासदारांनी आमच्याशी संपर्क साधला आहे. आपल्या मतदारसंघात विकासकामे झाली पाहिजेत, अशी त्यांची इच्छा आहे. यासाठी या दोन्ही खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देतो, असे सांगितले आहे", असं नरेश म्हस्के यांनी म्हटलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: बारामतीमध्ये जय पवार बाईक रॅलीमध्ये सहभागी

१२ डिसेंबरपासून राजासारखं आयुष्य जगणार 'या' राशी; आर्थिक फायद्यासह चांगल्या संधीही मिळणार

Cotton Price : कापसाला मिळाला साडेसात हजाराच्यावर दर; पहिल्याच दिवशी २५०० क्विंटलची आवक

Kashmera Shah Accident: कृष्णा अभिषेकच्या पत्नीचा परदेशात झाला भीषण अपघात, फोटो शेअर करत म्हणाली, जखमांचे व्रण...

GRAP-4 लागू करण्यास तीन दिवसांचा विलंब का? दिल्लीतील प्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने घेतला कठोर निर्णय

SCROLL FOR NEXT