Maharashtra Politics x
महाराष्ट्र

Maharashtra Politics : राज्यात मनसेला खिंडार, एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंना धक्का

Maharashtra Political News : वैभव खेडेकर यांना मनसेकडून बडतर्फ करण्यात आले. यानंतर मनसेला मोठा धक्का बसल्याचे म्हटले जात आहे. मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.

Yash Shirke

  • महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला कोकणात मोठा धक्का

  • अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश

  • वैभव खेडेकरांना बडतर्फ केल्यानंतर मनसेत पडझड

Maharashtra : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका लवकरच होतील असे संकेत आहेत. आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर मनसे पक्षाने मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली आहे. लवकरच मनसे आणि शिवसेना ठाकरे गट युती करणार असल्याचे म्हटले जात आहे. निवडणुकीच्या आधी मनसेला धक्का बसल्याची माहिती समोर आली आहे.

मनसेचे नेते आणि खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून बाहेर पडून भाजपमध्ये जाण्याच्या चर्चा रंगल्या होत्या. या चर्चा सुरु असताना वैभव खेडेकर यांच्यासह कोकणातील काही पदाधिकाऱ्यांना तातडीने बडतर्फ करण्यात आले. खेडेकर यांना बडतर्फ केल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला धक्का बसला आहे.

वैभव खेडेकर यांना बडतर्फ केल्यानंतर मनसेच्या अनेक कार्यकर्त्यांनीही पक्षातून राजीनामा दिला. काहीजणांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. या एकूण प्रकरणानंतर खेडमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. यामुळे मनसेला कोकणात खिंडार पडल्याचे म्हटले जात आहे.

मनसे शहराध्यक्षा मीनल गांधी, मनसे शाखा अध्यक्ष सुमित सकपाळ, मनसे कुंभारवाडा विभागप्रमुख नरेश मालवणकर यांच्यासह असंख्य पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिंदे गटात प्रवेश केला. रामदास कदम यांच्या जामगे येथील निवासस्थानी हा पक्षप्रवेश कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला रामदास कदम यांच्यासह गृहराज्यमंत्री योगेश कदम देखील उपस्थित होते. या पक्षप्रवेशामुळे कोकणात शिवसेनेची ताकद वाढली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शाळा सुटल्यानंतर दहावीच्या विद्यार्थिनीचा पाठलाग; एकट्यात गाठून अल्पवयीन मुलाने धारदार शस्त्राने संपवलं, नागपुरात खळबळ

Maharashtra Politics: जरांगेंच्या आडून सरकार बदलण्याचा प्रयत्न, 'सरकार उलथवण्यासाठी दादांचे नेते सामील'

Gold Ornaments: कोणत्या लोकांनी सोनं घालू नये? कारण एकदा वाचाच

Manoj Jarange Patil Protest Live Updates : आझाद मैदानात एका तरुणाचा फाशी घेण्याचा प्रयत्न

Manoj Jarange: मनोज जरांगेंना ओबीसीमधूनच आरक्षण का हवय?

SCROLL FOR NEXT