MNS Leader 4 Others Booked Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: मनसेच्या नेत्यासह ५ जणांविरोधात गुन्हा, धक्कादायक कारण आलं समोर

Case Register Against MNS Leader: वाशिममध्ये मनसे नेत्यासह ५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खंडणी मागितल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली.

Priya More
  • वाशिममध्ये मनसेच्या जिल्हाध्यक्षासह ५ जणांविरोधात गुन्हा

  • नर्सिंग कॉलेजच्या परीक्षेदरम्यान खंडणी मागितल्याचा आरोप

  • परीक्षा केंद्रात अनधिकृत प्रवेश करून गोंधळ घातल्याचा दावा

  • सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांकडून तपास सुरू

मनोज जयस्वाल, वाशिम

मनसेच्या बड्या नेत्यासह ५ कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. वाशिम पोलिसांनी ही कारवाई केली. नर्सिंग कॉलेजच्या परीक्षेत कॉपी होत असल्याचा आरोप करत त्यांनी खंडणी मागितली होती. या प्रकरणी मनसेच्या वाशिम जिल्हाध्यक्षासह पाच कार्यकर्त्यांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे वाशिकच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वाशिम जिल्हाध्यक्षासह पाच कार्यकर्त्यांनी नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्यांकडून खंडणी मागितली होती. खंडणी मागितल्याप्रकरणी पाचही जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाशिम शहरातील स्व. गोविंदराव देशपांडे कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये परीक्षा सुरू असताना मोठ्या प्रमाणात कॉपी सुरू असल्याचा आरोप करून मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी खंडणी मागितली होती. या प्रकरणी कॉलेज प्रशासनाच्या वतीने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल करण्यात आली होती.

परीक्षा केंद्रात अनधिकृत प्रवेश करून परीक्षा प्रक्रियेत अडथळा निर्माण केला, विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना धमकावले आणि खंडणीची मागणी केली होती, असा आरोप महाविद्यालय प्रशासनानं केला असून या प्रकरणी मनसेचे जिल्हाध्यक्ष राजू किडसे यांच्यासह पदाधिकारी आकाश सुनील लोलप, उमेश टोलमारे तसेच अन्य दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध गंभीर कलमान्वये वाशिम शहर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील सीसीटीव्ही फुटेजही समोर आले असून पोलिस त्याची पडताळणी करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जरांगेंनी शिंदे-फडणवीस यांच्यावर टीका करू नये - विखे पाटील

Horoscope : ‘या’ 3 राशींच्या नशिबात पैसा आणि प्रेमाचा योग; केतू गोचर देणार मोठे संकेत

Plane Accident: टेकऑफ घेताच फाटला विमानाचा टायर, नंतर इंजिनही बिघडले; थरकाप उडवणारा VIDEO समोर

Shiv Sena Live : शिंदे की ठाकरे, शिवसेना कुणाची? थोड्याच वेळात सुनावणी होणार

Sleep Problems: मध्यरात्री अचानक झोपेतून जाग येते? रात्री झोप उडण्यामागची 'ही' ७ कारणं जाणून घ्या

SCROLL FOR NEXT