Buldhana Politics  Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: कुणीही असू द्या, ओढून मारू; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याची ठाकरेंच्या आमदाराला थेट धमकी

Buldhana Politics: बुलडाण्यामध्ये शिवसेना शिंदेगट आणि ठाकरे गटामधील वाद पेटला आहे. शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याने थेट ठाकरेंच्या आमदाराला धमकी दिली. कुणीही असू द्या, ओढून मारू, असे विधान शिंदेंच्या पदाधिकाऱ्याने केले.

Priya More

Summary -

  • बुलडाण्यातील मेहकरमध्ये राजकीय वाद तीव्र

  • शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याची आमदाराला धमकी

  • पत्रकार परिषदेत शिंदेंच्या पदाधिकाऱ्याचे वादग्रस्त वक्तव्य

  • शिवसेना शिंदे-ठाकरे गटांमध्ये तणाव वाढला

संजय जाधव, बुलडाणा

बुलडाण्याच्या मेहकरमध्ये राजकीय वाद चांगलाच पेटला आहे. शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट आक्रमक झाला आहे. शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याने थेट ठाकरे सेनेच्या आमदाराला धमकी दिली. 'कुणीही असू द्या ओढून मारू', असे म्हणत शिंदेंच्या शिवसैनिकाने ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सिद्धार्थ खरात यांना भर पत्रकार परिषदेत थेट धमक दिली. यामुळे बुलडाण्यात दोन्ही शिवसैनिकामध्ये वाद उफाळाला आहे. या धमकीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मेहकर शहरात सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले असून शिवसेना शिंदे गटाच्या एका पदाधिकाऱ्याने पत्रकार परिषदेत अत्यंत आक्रमक आणि वादग्रस्त भाषा वापरत आमदाराला धमकी दिली. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार सिद्धार्थ खरात यांना त्यांनी थेट धमकी दिल्याचा आरोप केला जात आहे. 'कोणीही असू द्या, आमदारालाही ओढून मारू', असे धक्कादायक विधान शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याने केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

या पत्रकार परिषदेत बोलताना संदीप तठ्ठे यांनी आपल्या शिंदेसेनेचे माजी आमदार संजय रायमुलकर यांच्या कामाचे श्रेय इतरांनी घेऊ नये, अन्यथा गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशारा दिला. 'आमच्यावर आधीच २५-२५ गुन्हे दाखल आहेत, त्यामुळे आम्ही कोणालाही घाबरत नाही.', असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

या भडक वक्तव्यामुळे मेहकरमधील राजकीय वातावरण अधिकच तापले असून विविध पक्षांकडून या वक्तव्याचा निषेध होण्याची शक्यता आहे. तसेच, या प्रकरणी प्रशासन कोणती भूमिका घेते याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद पुढील काही दिवसांत अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या बुलडाण्यातील राजकिय वातावरण चांगलेच तापले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT