Buldhana News  saam tv
महाराष्ट्र

Buldhana Shivsena Melava : शिवसेना मेळाव्याच्या बॅनरवरून एकनाथ शिंदेंचा फोटो गायब, संजय गायकवाड नाराज? बुलढाण्यात चर्चेला उधाण

Buldhana News : बुलढाण्यातील संवाद मेळाव्यातील बॅनरवर पक्षाचे नाव, चिन्ह आणि एकनाथ शिंदेंचा फोटो नसल्याने बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्या नाराजीच्या चर्चांना उधाण.

Alisha Khedekar

  • चिखलीत आमदार संजय गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली संवाद मेळावा आयोजित.

  • बॅनरवर फक्त गायकवाड आणि मुलाचा फोटो; पक्षाचे नाव, चिन्ह, एकनाथ शिंदेंचा फोटो गायब.

  • या पार्श्वभूमीवर नाराजीच्या चर्चांना उधाण.

  • गायकवाड यांनी या विषयावर थेट प्रतिक्रिया दिली नाही.

बुलढाण्याचे शिवसेना (शिंदे गट) आमदार संजय गायकवाड पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत आणि यावेळी कारण आहे त्यांच्या पक्षाच्या संवाद मेळाव्यातील बॅनर. अलीकडेच पक्षाने त्यांची जिल्हा संघटकपदी नियुक्ती केली असून, त्या निमित्ताने त्यांनी चिखली शहरात पहिल्यांदाच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा घेतला. मात्र या मेळाव्यातील बॅनरने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले.

स्टेजवरील बॅनरवर फक्त संजय गायकवाड आणि त्यांचा मुलगा मृत्युंजय गायकवाड यांचेच फोटो होते. विशेष म्हणजे या बॅनरवर शिवसेना हे नाव, पक्षाचे चिन्ह, बाळासाहेब ठाकरे किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोटो यांचा पूर्णतः अभाव होता. पक्षाच्या मेळाव्यांमध्ये साधारणपणे वरिष्ठ नेत्यांचे फोटो, पक्षाचे नाव आणि चिन्ह असणे ही परंपरा आहे, मात्र यावेळी या सगळ्याच गोष्टींचा अभाव असल्याने संजय गायकवाड हे पक्षावर नाराज आहेत का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

गायकवाड यांच्या राजकीय प्रवासात ते वादग्रस्त विधानं आणि कृतीमुळे नेहमीच चर्चेत राहिलेले आहेत. आता या बॅनरमधील तपशील पाहता, त्यांच्या नाराजीबद्दल चर्चा रंगू लागल्या आहेत. या विषयावर त्यांनी थेट प्रतिक्रिया देण्याचे टाळले असले तरी त्यांच्या भूमिकेतील हा बदल अनेकांच्या भुवया उंचावणारा ठरत आहे.

स्थानिक पातळीवर या घडामोडीमुळे विविध चर्चा सुरू आहेत. पक्षातील काही कार्यकर्ते हा प्रकार केवळ एक तांत्रिक चूक असल्याचे सांगत आहेत, तर काहींना वाटते की हा मुद्दाम केलेला पाऊल असू शकतो, ज्यातून गायकवाड यांची नाराजी स्पष्ट होते. पुढील काही दिवसांत या प्रकरणाला राजकीय वळण मिळते का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

चिखलीतील संवाद मेळाव्यातील बॅनरवर कोणते फोटो होते?

फक्त आमदार संजय गायकवाड आणि त्यांचा मुलगा मृत्युंजय गायकवाड यांचेच फोटो होते.

बॅनरवर काय नव्हते?

शिवसेना हे नाव, पक्षाचे चिन्ह, बाळासाहेब ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोटो नव्हते.

यामुळे कोणत्या चर्चा सुरू झाल्या?

संजय गायकवाड हे शिंदे गटावर नाराज आहेत का, याबाबत चर्चा रंगल्या.

गायकवाड यांनी यावर काय प्रतिक्रिया दिली?

त्यांनी थेट उत्तर देण्याचे टाळले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Supreme Court : शाळांमध्ये मोफत सॅनिटरी नॅपकिन्स, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

Maharashtra Live News Update: लाडक्या बहिणींची पडताळणी खोळंबणार, अंगणवाडी कर्मचारी संघटनेचा कामास स्पष्ट नकार

Cancer Treatment: गूड न्यूज! कॅन्सर कायमचा नष्ट होणार; तज्ज्ञांना मिळालं सोल्युशन

Crime News : दुचाकीवरून घेऊन गेला, वाटेत कॅनॉलमध्ये बुडवून मारलं; जन्मदात्या बापाने घेतला ७ वर्षाच्या मुलीचा जीव

Sunetra Pawar Oath Ceremony : सुनेत्रा पवारांच्या शपथविधीला उपस्थित राहणार? शरद पवारांचं मोठं विधान

SCROLL FOR NEXT