Rohit pawar News  Saam tv
महाराष्ट्र

Rohit Pawar News: अजितदादांच्या खात्यावर फडणवीसांचा अंकुश; संमतीशिवाय निधी न देण्याच्या सुचना... रोहित पवारांचा गंभीर आरोप

Maharashtra Politics: अजितदादांच्या खात्यावर अंकुश ठेवण्याचा प्रकार असून तो योग्य वाटत नाही... असे रोहित पवार यांनी म्हणाले.

Gangappa Pujari

Rohit Pawar On Devendra Fadanvis:

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात फुट पडल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट पडले आहेत. अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना भरघोस निधी दिल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. परंतु शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी निधी वाटपाच्या मुद्द्यावरुन टीका करताना अजित पवार यांच्या खात्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अंकुश ठेवण्याचे काम करत असल्याचे म्हणले आहे.

काय म्हणाले रोहित पवार?

राष्ट्रवादीच्या (NCP) शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) वारंवार राज्य सरकारवर निशाणा साधताना दिसत आहेत. दोन दिवसांपूर्वीच कंत्राटी भरतीच्या निर्णयावरुन त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला होता. आता पुन्हा एकदा रोहित पवार यांनी अजित पवार यांच्याकडे असलेल्या अर्थखात्याच्या निधी वाटपावरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यावर टीका केली आहे.

"माझ्या मतदारसंघातील कर्जत आणि जामखेड या दोन्ही ठिकाणच्या शासकीय रुग्णालयांचं काम अर्धवट होऊन निधीअभावी ठप्प झालंय. अर्थमंत्री अजितदादा (Ajit Pawar) आहेत, मात्र या रुग्णालयासाठी आपल्या संमतीशिवाय निधी द्यायचा नाही, अशा सूचना फडणवीस साहेब आपण दिल्यात. हा आपल्या समकक्ष असलेल्या मा. अजितदादांच्या खात्यावर अंकुश ठेवण्याचा प्रकार असून तो योग्य वाटत नाही... असे रोहित पवार यांनी आपल्या एक्सपोस्टमध्ये म्हणले आहे.

राजकारण तर आपण नेहमीच एकमेकांच्या विरोधात करतो. पण ते विचारांचं आणि तत्त्वांचं असावं… राजकारणापायी सामान्य माणूस भरडला जाऊ नये, हे आपल्यासारख्या मोठ्या नेत्याला सांगण्याची वेळ यावी, यापेक्षा दुर्दैव ते काय! हे शेअर केलेले फोटो बघितले तर इतकं काम होऊनही १ रुपयाही निधी दिलेला नाही आणि अशीच अवस्था राज्यातील इतर २६ कामांचीही आहे. मायबाप सरकार हे आपल्याला तरी योग्य वाटतं का? असा सवालही रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंग्या किती वेळ झोपतात माहितीये का? वेळ ऐकून तुम्हीही व्हाल हैराण

Maharashtra Live News Update: कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये राडा! पुण्यात दोन गटात तुफान हाणामारी

दिवाळीत दिव्यामध्ये केसर टाकल्यास काय होतं?

Nagpur Crime : मुलगा-सून मुंबईला गेले, घरात आईची निर्घुण हत्या; नागपूरात भयकंर घडलं

Urmila Kanetkar: ती परी असमानीची....; निसर्गरम्य वातावरण आणि उर्मिलाच्या मनमोहक अदा

SCROLL FOR NEXT