अक्षय शिंदे, साम टीव्ही जालना
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात वातावरण आणखी तापलंय. नारायण राणे मराठवाड्यात जावून जरांगेंचा समाचार घेतो, असं वक्तव्य केलं होतं. यावर आता 'मला काय बघणार आहे तुम्ही?' असा सवाल जरांगे पाटलांनी विचारलाय. नारायण राणे (Narayan Rane) यांना मराठवाड्यात यायचं नाही, असं मी कधीही म्हणालो नाही. मला बळजबरी धमकी देता का? मी बघायला लागल्यावर लई फजिती होईल, असा इशारा देखील जरांगे पाटलांनी दिलाय. मी निलेश साहेबांना वेळोवेळी त्यांना समजून सांगावं, अशी विनंती केल्याचं देखील मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.
जरांगे पाटलांचा इशारा
मला आणि माझ्या समाजाला राजकारणात यायचं नाही. १३ तारखेपर्यंत त्यांना संधी ९ (Maharashtra Politics दिलीय. उद्या राजकारणात आलो तर, आरक्षणाच्या आडून यांना राजकारण करायचं आहे, असं म्हणू नका असा इशारा देखील जरांगे पाटील यांनी दिलाय. ज्यांना निवडणूक लढवयाची त्यांनी कागदपत्रांची तयारी ठेवा. आतापासूनच कागदपत्रं काढून ठेवा. सगळ्यांनी ठरलेल्या एकाच उमेदवाराच्या पाठीमागे उभा राहायचं, असं आवाहन त्यांनी मराठा समाजाला केलंय.
मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला
मी ओबीसीतून आरक्षण घेणार आहे, असं देखील मनोज जरांगे म्हणाले (Manoj Jarange Patil) आहेत. हे आंदोलन सुरू आहे, तसं राजकारणातंल आंदोलन देखील सुरू असल्याची टीका त्यांनी केलीय. एक वर्षापासून आंदोलन सुरू आहे. देशात आतापर्यंत झालं नसेल असं आंदोलन एक समाज एका गावात करत आहे. माणूस किती दिवस आशा ठेवणार? असा सवाल देखील त्यांनी विचारला आहे.
स्वाभिमान गहाण ठेवून पक्षासाठी काम
राम कदम यांच्याबद्दल मत चांगलं आहे, तरीदेखील त्यांनी कशाला यामध्ये उडी ( Maratha Reaservation Issue) घेतली? मी स्वाभिमान गहाण ठेवून पक्षासाठी काम करणारा त्यांच्यासारखा नाही, अशी टीका देखील जरांगे यांनी केलीय. मला माझा मराठा समाज मोठा करायचा आहे, मी ठरवलंय मागे हटायचं नाही. राम कदम यांचा दहीहंडी आमदार म्हणून उल्लेख केलाय.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.