Manikrao Kokate  Saam Tv
महाराष्ट्र

Manikrao Kokate: राजीनामा द्यायला मी काय विनयभंग केलाय का? कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंचा संतप्त सवाल

Manikrao Kokate On Rammy Game: कृषमीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी आज पत्रकार परिषद घेत विधानसभेत रम्मी खेळताचा जो व्हिडीओ व्हायरल झाला होता त्यावर प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी विरोधकांनाच इशारा दिला.

Priya More

विधानसभेत रम्मी गेम खेळताचा कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या प्रकरणी माणिकराव कोकाटे यांनी आज नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेत यामागचे स्पष्टीकरण दिलं. 'सभागृहातील व्हिडीओचा विषय छोटा आहे. राजीनाम्यासारखं काय घडलं आहे. मी काय विनयभंग केला आहे का?', असा संतप्त सवाल माणिकराव कोकाटे यांनी केला. तर, 'विरोधकांनी माझी जी बदनामी केली आहे त्याबाबत मी त्यांना कोर्टात खेचणार आहे.', असे माणिकराव कोकाटे यांनी सांगितले.

माणिकराव कोकाटे यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विरोधकांकडून त्यांच्या राजीनामाच्या सातत्याने मागणी केली जात आहे. याच मुद्द्यावरून माणिकराव काकाटे संपापले. त्यांनी सांगितले की, 'सभागृहातील व्हिडीओचा विषय छोटा आहे. हा विषय ऐवढा लांबला का हे माहिती नाही. राजीनामा देण्यासारखं मी काय केलं आहे. मी काय विनयभंग केला आहे का? मी काय चोऱ्यामाऱ्या केल्या आहेत का, मी काय गुन्हा केला आहे का? माझी पार्श्वभूमी गुन्हेगारीची आहे का', असे अनेक सवाल माणिकराव कोकाटे यांनी उपस्थित केले.

यावेळी माणिकराव कोकाटे यांनी मला रम्मीच खेळता येत नसल्याचे सांगितले. ते म्हणाले की, 'ऑनलाईन रम्मी काय प्रकार आहे माहिती आहे का? ऑनलाईन रम्मी खेळताना तुम्हाला तुमचे बँक अकाऊंट जोडावे लागते त्याशिवाय मला रम्मी खेळता येत नाही. माझे बँक अकाऊंट मी इथे देणार आहे. ज्या दिवसापासून ऑनलाईन रम्मी सुरू झाली तेव्हापासून मी आजपर्यंत कधीच रम्मी खेळलो नाही हे तुम्हीसुद्धा चेक करू शकता.'

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांचा रम्मी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल केला होता. त्यामुळे रोहित पवारांना कोर्टात खेचणार असल्याचे माणिकराव कोकाटे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 'विरोधकांनी विनाकारण राज्यभर माझी बदनामी केली. ज्यांनी ज्यांनी माझी बदनामी केली त्यांना मी कोर्टात खेचणार आहे. त्यांच्याविरोधात मी अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची गरज आहे. जर मी दोषी सापडलो तर त्या क्षणाला मी न थांबता राज्यपालाकडे माझा राजीनामा सादर करेल.', असे कोकाटेंनी स्पष्ट केले.

हा व्हिडीओ शूट करण्यापूर्वी नेमकं काय घडलं होतं याबद्दल सांगताना माणिकराव कोकाटे म्हणाले की, 'हाऊसमध्ये माझी लक्षवेधी होती. त्यापूर्वी माहिती मागवण्यासाठी मी मोबाईल उघडला तर गेम समोर आला. मोबाईलमध्ये कुठलाही गेमचे लगेच पॉपअप येते. मोबाईल उघडताच मी त्याला स्वाईप करण्याचा प्रयत्न करत होता तेव्हा रम्मीचा पॉपअप आला. व्हिडीओ स्कीप करेपर्यंत तो व्हिडीओ काढण्यात आला. तो पूर्ण खेळ का नाही दाखवला त्यांनी. पूर्ण खेळ दाखवला असता तर लक्षात आले असते. मुळात मला रम्मी खेळता येत नाही.' असे देखील माणिकराव कोकाटे यांनी स्पष्ट केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Crime : ठाकरे गटाच्या आमदाराच्या जवळच्या सहकाऱ्याचा धिंगाणा, कारमधून फोडले २८८ फटाके, VIDEO

Shocking : आशियाई खेळात भारताचं नेतृत्व करणाऱ्या खेळाडूने आयुष्य संपवलं, क्रीडा विश्वात खळबळ

भारताविरोधात चीन्यांची नवा डाव? पेंगाँग जवळ चीनचा हवाई तळ?

Shocking : कॉलेजला जाताना अडवलं; भररस्त्यात तरुणीवर तरुणाकडून अॅसिड हल्ला, राजधानीत खळबळ

Vitamins: जास्त व्हिटॅमिन्सही बरं नव्हं! अति सेवनाने आरोग्यावर होतो दुष्परिणाम

SCROLL FOR NEXT