Maharashtra Politics x
महाराष्ट्र

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसणार? मोठ्या पदावरील युवा नेता महायुतीच्या वाटेवर

Maharashtra Political News : कोकणामध्ये शिवसेना ठाकरे गटाला धक्का बसणार असल्याची चर्चा रंगली आहे. बड्या पदावर असलेला युवा नेता हा महायुतीच्या वाटेवर असल्याचे म्हटले जात आहे.

Saam Tv

  • कोकणात ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता.

  • बड्या पदावरील युवा नेता महायुतीच्या वाटेवर असल्याची चर्चा.

  • शिंदे गट-भाजप नेत्यांशी गुप्त भेटीगाठींनी राजकीय खळबळ.

Maharashtra : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांमध्ये इनकमिंग आणि आउटगोईंग सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. निवडणुकींच्या आधी रत्नागिरीतील दापोली, खेड मतदारसंघात राजकीय उलथापालथ सुरु असल्याचे म्हटले जात आहे. खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर दुसऱ्या पक्षात जाणार असल्याची चर्चा सुरु असताना मनसेने त्यांना निलंबित केले. ते आता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. राज ठाकरे यांच्यानंतर आता उद्धव ठाकरेंच्या पक्षातील युवा नेता महायुतीच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दापोली, खंड, मंडणगड विधानसभा मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटातील युवा नेता हा महायुतीच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शिंदे गट आणि भारतीय जनता पक्षातील पदाधिकाऱ्यांशी या युवा नेत्याच्या भेटीगाठी सुरु असल्याचे बोलले जात आहे.

ठाकरे गटाचे माजी आमदार संजय कदम यांनी शिंदे गटात प्रवेश केला. संजय कदम यांच्या प्रवेशानंतर दापोली नगर पंचायतीतील नगरसेवकांनीही शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. ठाकरे गटाच्या माजी नगराध्यक्ष ममता गोरे यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, शिवसेनेचे अनिल परब यांचा फोटो वाढदिवसाला सोशल मीडियावर टाकला होता. एकूणच ठाकरे गटातून कोकणात आउटगोईंग सुरु असल्याचे म्हटले जात आहे.

दापोलीमधील शिवसेना ठाकरे गटाचा युवा नेता पक्षामध्ये अस्वस्थ असल्याची चर्चा रंगली आहे. शिवसेना शिंदे गटातील काही नेत्यांसोबत या युवा नेत्याने गुप्त बैठका घेतल्याचेही म्हटले जात आहे. याआधी भाजपमधील काही नेत्यांसह, पदाधिकाऱ्यांसह युवा नेत्याने भेटीगाठी केल्या आहेत. हा युवा नेता ठाकरे गट सोडून महायुतीत जाणार असल्याची चर्चा सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Dasara Melava Live Update : देशाला आत्मनिर्भर होण्याची गरज - मोहन भागवत

RBI चा मोठा निर्णय! आता या खातेधारकांसाठी डिजिटल सेवा सुरु; कोट्यवधी ग्राहकांना होणार फायदा

Governemnt Job: बेरोजगारांना मोठा दिलासा! १० हजार ३०९ जणांना शासकीय नोकरी | VIDEO

Maharashtra Rain : राज्यात मान्सूनला निरोप कधी? परतीच्या पावसाची तारीख आली समोर

Maggi Recipe : पहाडी-स्टाइल चटकदार मॅगी घरीच १० मिनिटांत बनेल, फक्त फॉलो करा 'ही' रेसिपी

SCROLL FOR NEXT