NCP SHARAD PAWAR PARTY REMOVES ALL SPOKESPERSONS; MAJOR ORGANISATIONAL RESHUFFLE ANNOUNCED saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: राष्ट्रवादीत मोठी घडामोड! शरद पवार पक्षाच्या सर्व प्रवक्त्यांच्या नियुक्त्या बरखास्त

Maharashtra Politics : शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षसंघटनेत मोठे फेरबदल जाहीर केले आहेत. पुढील आदेशापर्यंत सर्व प्रवक्त्यांच्या नियुक्त्या तात्काळ प्रभावाने रद्द करण्यात आल्याचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सांगितले.

Bharat Jadhav

राज्यातील राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी एक मोठी घोषणा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक फेररचनेच्या दृष्टीने आणि पक्षाची ध्येयधोरणे अधिक प्रभावीपणे मांडण्यासाठी आजपासून पक्षाच्या प्रवक्ते पदासंदर्भातील महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सोशल मीडियावरून दिली. (Sharad Pawar-led NCP has announced a major organisational reshuffle)

पक्षाच्या सर्व प्रवक्ते पदाच्या नियुक्त्या पुढील आदेश होईपर्यंत तत्काळ प्रभावाने बरखास्त करण्यात येत असल्याची मोठी घोषणा शशिकांत शिंदे यांनी केली आहे. यापुढील काळात पुढील आदेश येईपर्यंत नियुक्त्या बरखास्त करण्यात आल्यात. तर पक्षाची अधिकृत भूमिका प्रसारमाध्यमांसमोर मांडण्यासाठी माजी आमदार विद्या चव्हाण आणि महेश तपासे यांच्यावर सोपवण्यात आलीय. ते अधिकृत प्रवक्ते म्हणून जबाबदारी सांभाळतील. पक्षहित आणि संघटन मजबूत करण्यासाठी सर्वांनी या निर्णयाची गांभीर्याने नोंद घ्यावी", असं आवाहन शशिकांत शिंदे यांनी केलंय.

दरम्यान शरद पवारांच्या पक्षातील प्रवक्त्यांच्या नियुक्त बरखास्त करण्याची वेळेमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगलीय. काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर जहरी टीका केली. या टीकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. काँग्रेसच्या टीकेविरोधात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते राज्यभरात आंदोलने करत आहेत. मुंबईत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या कार्यालयात घुसून जोरदार घोषणाबाजी केली. त्याचदरम्यान शरद पवार गटानं महत्त्वाचा निर्णय घेतलाय. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : सण-उत्सव गोड होणार! लाडक्या बहिणींसाठी ३००० कोटी; फडणवीस सरकारचा शासन निर्णय

Maharashtra News Live Update: भोसरी एमआयडीसीतील कंपनीला भीषण आग

Tamarind Benefits For Glowing Skin: ग्लोईंग स्किनसाठी चिंचेचा फेसपॅक ठरेल फायदेशीर; असा बनवा घरच्या घरी

Face Care: चेहरा निस्तेज आणि काळवंडलेला वाटतोय? मग आठवड्यातून २ वेळा लावा हा घरी तयार केलेला फेसपॅक

Vande Bharat: निसर्ग आणि तंत्रज्ञानाचा अद्भुत संगम! पश्चिम घाटातून धावणाऱ्या 'वंदे भारत'ची मनमोहक दृश्य, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT