Sharad Pawar  Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंची मोठी खेळी, शरद पवारांना दिला धक्का; ३ दिग्गज नेते 'धनुष्यबाण' घेणार हाती

Major Setback for Sharad Pawar In Pandharpur: पंढरपूरमध्ये शरद पवारांना मोठा धक्का बसला. बड्या नेत्याने पक्षाची साथ सोडली असून ते उद्या शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते देखील धनुष्यबाण हाती घेणार आहेत.

Priya More

Summary -

  • पंढरपूरमध्ये शरद पवार गटाला धक्का

  • शिंदे गटात ३ दिग्गज नेत्यांचा प्रवेश

  • पंढरपूरमध्ये शिवसेनेचा मोठा राजकीय मेळावा

  • शिवसेनेची ताकद वाढण्याची शक्यता

पश्चिम महाराष्ट्रामध्ये शरद पवारांना मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते अनिल सावंत यांन पक्षाला रामराम ठोकला. ते उद्या शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहेत. पंढरपुरमध्ये होणाऱ्या शिवसेना शिंदे गटाच्या मेळाव्यामध्ये त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. पंढरपुरमध्ये या मेळाव्याची जय्यत तयारी सुरू आहे. अनिल सावंत यांच्यासह ३ नेते शिंदेगटात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे पंढरपुरमध्ये शिंदेगटाची ताकद वाढणार आहे.

पंढरपुरमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पंढरपुरच्या नगराध्यक्षा प्रणिता भालके, भगीरथ भालके आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल सावंत हे शिवसेना शिंदेगटामध्ये प्रवेश करणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये ते शिवसेनेचे धनुष्यबाण हाती घेणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून नाराज असलेल्या अनिल सावंत हे शिंदेगटाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू होती. अखेर त्यांनी निर्णय घेतला असून ते उद्या म्हणजे १२ एप्रिल रोजी धनु्ष्यबाण हाती घेणार आहेत.

पंढरपूर येथील टिळकस्मारक मैदानात शनिवारी दुपारी २ वाजता शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपुरमध्ये येणार आहेत. त्यांच्याच उपस्थितीमध्ये अनिल सावंत यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. या मेळाव्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते उपस्थित राहणार आहेत. यावेळी तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नगरसेवक, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य आणि सरपंच यांच्यासह शेकडो कार्यकर्ते शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती भगीरथ भालके यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai-Pune Expressway Missing Link: मुंबई- पुणे कनेक्टिव्हिटी बिघडली; एक्सप्रेसवेवर कोंडी नियोजनचं 'मिसिंग'

LPG Cylinder: महागाईच्या झळा, सामान्यांना 'कळा'! व्यावसायिक सिलेंडर 993 रुपयांनी महागला; खाद्यपदार्थांच्या किंमती वाढणार?

Pune Crime: गुरांच्या गोठ्यात ४ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, लैंगिक अत्याचारानंतर चिमुरडीची हत्या

Mumbai Pune Missing Link : 'मिसिंग लिंक'ला विरोध; लोणावळ्यातून प्रवेश देण्याची मनसेची मागणी

Ladki Bahin Yojana: राज्यातील १ कोटी ८९ लाख लाडक्या बहिणी पात्र; ५४ लाख बहिणींना नाही मिळणार १५०० रुपये

SCROLL FOR NEXT