Maharashtra Politics Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : NCP अजित पवार गटाच्या आमदाराला मोठा धक्का, कोट्यवधींच्या घोटाळा प्रकरणात सख्ख्या पुतण्याला अटक

NCP MLA Daulat Daroda: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार दौलत दरोडा यांना मोठा धक्का बसला. दौलत दरोडा यांच्या सख्ख्या पुतण्याला पोलिसांनी अटक केली. कोट्यवधींच्या भात खरेदी घोटाळा प्रकरणी ही कारवाई करण्यात आली.

Priya More

Summary -

  • राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार दौलत दरोडा यांना मोठा धक्का

  • पुतण्या हरीश दरोडा याला दीड कोटींच्या भात खरेदी घोटाळ्यात अटक

  • आरोपी दोन वर्षांपासून फरार होता

  • अखेर शहापूर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या

फैय्याज शेख, शहापूर

राज्याच्या राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या आमदाराला मोठा धक्का बसला आहे. आमदाराच्या पुतण्याला कोट्यवधींच्या भात खरेदी घोटाळा प्रकरणात अटक करण्यात आली आहे. शहापूरचे विद्यमान आमदार दौलत दरोडा यांच्या पुतण्याला अटक करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे. त्यांचा पुतण्या गेल्या २ वर्षांपासून फरार होता. अखेर पोलिसांनी कारवाई करत त्याला बेड्या ठोकल्या.

कोट्यवधींच्या भात खरेदी घोटाळा करून वर्षभरापासून कागदोपत्री फरार झालेले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहापूरचे विद्यमान आमदार दौलत दरोडा यांच्या पुतण्याला अटक करण्यात आली आहे. हरीश उर्फ भाऊ दरोडा तब्बल २ वर्षांनी पोलिसांच्या तावडीत सापडला आहे. ठाणे ग्रामीण आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी हरीश दरोडाला शहापूरमधून अटक केली. खळबळजनक बाब म्हणजे शहापूर तालुक्यातील साकडबाव केंद्रातील तब्बल ५ हजार क्विंटल भाताची अफरातफर केल्याप्रकरणी हरीश दरोडा याच्यावर किन्हवली पोलिस ठाण्यात डिसेंबर २०२३ ला गुन्हा दाखल करण्यात आला होता.

नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात हरीश दरोडा याचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला होता. आता आमदाराच्या सख्ख्या पुतण्याला पोलिसांनी अटक केल्यानं शहापूर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.ठाणे जिल्ह्यातील शहापूरचे आदिवासी विकास महामंडळ म्हणजे भात खरेदीतील भ्रष्टाचाराचे कुरण बनले आहे. गेल्या २ ते ३ वर्षांत याठिकाणि जवळपास १६ कोटींचा भात खरेदी घोटाळा उघडकीस आला आहे. या भात खरेदीचा शहापूर तालुक्यातील साकडबाव केंद्रात देखील दीड कोटींचा भात खरेदी घोटाळा उघडकीस आला होता.

या प्रकरणी आमदार दौलत दरोडा यांचा पुतण्या आणि साकडबाव आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे अध्यक्ष हरीश दरोडा, सचिव संजय पांढरे, केंद्रप्रमुख जयराम सोगीर तसेच महामंडळाचे जव्हारचे तत्कालीन प्रादेशिक व्यवस्थापक विजय गांगुर्डे, शहापूरचे तत्कालीन उपप्रादेशिक व्यवस्थापक अविनाश राठोड, तत्कालीन विपणन निरीक्षक समाधान नागरे यांनी शेतकऱ्यांच्या खोट्या आणि बोगस चलन पावत्या बनवून शासनाची आणि आदिवासी विकास महामंडळाची सुमारे दीड कोटींची फसवणूक केली होती याप्रकरणी किन्हवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Politics: आरोप सिद्ध नाही झाले तर राजकारण सोडा; मुरलीधर मोहोळ यांचे अजित पवारांना "ओपन चॅलेंज"

भारत-कंबोडिया ते व्हिएन्टिन, दररोज व्हायची मारहाण; किडनी विकलेल्या शेतकऱ्याने मांडली व्यथा, काँग्रेस मदतीला धावली

Tilak Verma: टीम इंडियाच्या टी २० वर्ल्डकप मिशनला जबरा धक्का; भारत-न्यूझीलंड मालिकेतील ३ सामन्यांमधून धुरंधर तिलक वर्मा बाहेर

बिनविरोधनंतर आता बिनशर्तचा धडाका, ऐन निवडणुकीत ठाकरेंचा उमेदवार शिंदेसेनेत

EPFO मध्ये मोठा बदल; पाच वर्ष असो की १०वर्ष झटक्यात मिळेल जुना PF नंबर; जाणून घ्या प्रोसेस

SCROLL FOR NEXT