भाजपच्या शहराध्यक्ष मोहिनी मडगावकर यांनी पदाचा राजीनामा दिला.
पक्षांतर्गत वाद आणि नेतृत्वावरील नाराजीमुळे हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.
भाजपसाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.
विनायक वंजारे, साम प्रतिनिधी
विधान परिषदेच्या निवडणुकी्या पार्श्वभूमीवर कोकणातील राजकारण तापलंय. नेहमीच गार हवामानासाठी ओळखलं जाणारं कोकण राजकारणामुळे येथील वातावरण तापलंय. एकीकडे विधान परिषदेची जागा जिंकण्यासाठी भाजप साम-दाम-दंड भेद चा वापर आहेत. पण दुसरीकडे पक्षामधील वाद चव्हाट्यावर आला आहे. याच वादामुळे अख्खं शहर कार्यकारिणीनं आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
सिंधुदुर्गात सावंतवाडी मधील भारतीय जनता पक्षाच्या शहर कार्यकारिणीने आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. पक्षांतर्गत दुफळीमुळे हा राजीनामा देण्यात आला आहे. शहराध्यक्ष तथा नगरसेविका मोहिनी मडगावकर आणि त्यांच्या संपूर्ण कार्यकारिणीने राजीनामा दिला आहे. सरचिटणीस आणि महेश सारंग आणि जिल्हाध्यक्षाच्या दबावामुळे पक्षाती कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. जिल्हाध्यक्ष आणि सरचिटणीस इतर पदाधिकाऱ्यांविरोधात राजकारण करत असल्याचा आरोप राजीनामा दिलेल्या कार्यकारणीने केला आहे.
मोहिनी मडगावकर यांनी पत्रकार परिषद घेऊन महिला जिल्ह्याध्यक्ष श्वेता कोरगावकर, सरचिटणीस महेश सारंग व जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या दबावामुळे आपण पदाचा राजीनामा देत असल्याच सांगितलंय. फक्त आपल्याच शहर अध्यक्षपदाचे काम थांबविण्यास सांगण्याचे कारण काय असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
राजीनामा बाबत बोलताना मोहिनी मडगावकर म्हणाल्या की, माझ्या जागी दुसऱ्याला आणायला म्हणजेच माझ्या पदावर दुसऱ्याला बसवलं जात होतं, याबाबत महिला जिल्ह्याध्यक्ष श्वेता कोरगावकर आणि सरचिटणीस सारंग आणि जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत हे कट कारस्थान करत असल्याची बाब मला समजली. या राजकारणामागे महेश सारंग आहेत, त्यांच्या सांगण्याववरून हे घडतंय.असा प्रकार माझ्यासोबत दोनवेळा झाला आहे.
आता मी कार्यकर्ती म्हणून काम करेल. त्यांना माझ्या जागी ज्याला कोणाला बसवायचं असेल त्याला बसवावं. त्यांनी माझ्या कार्यकारणीमधील कोणालाच पदाविषयी चर्चा केली नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी आणि वेंगुर्ले नगर परिषदेत भाजपचे वर्चस्व आहे. मात्र पक्षातील अंतर्गत वादामुळे पक्षाच्या मोटबांधणीला वाळवी लागली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.