सायन कोळीवाड्याचे माजी नगरसेवक रामदास कांबळे यांनी शिंदे गटात प्रवेश केला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे गट आपली ताकद वाढवत आहे.
या पक्षांतरामुळे उद्धव ठाकरे गटाला स्थानिक राजकारणात मोठा धक्का बसला आहे.
आगामी काळात स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका होणार आहेत. त्यापार्श्वभूमीवर शिंदे गट मुंबईत आपली ताकद वाढवत आहे. आजी-माजी नगरसेवकांचा पक्षप्रवेश करून ते आपला दबदबा निर्माण करू पाहत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मुंबई महानगर पालिकेचे सायन कोळीवाडामध्ये उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिलाय.
सायन कोळीवाडा येथील ठाकरे गटाचे माजी नगरसेवक रामदास कांबळे यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत रामदास कांबळे यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. रामदास कांबळे हे सायन कोळीवाडा येथील नगरसेवक होते. कांबळे यांच्या पक्षप्रवेशामुळे शिंदेंची ताकद वाढलीय.
कांबळे यांचा पक्षप्रवेश होताच एकनाथ शिंदेंनी त्यांच्यावर मोठी जबाबदारी दिलीय. रामदास कांबळे यांची युवक कार्यकारणीमध्ये निवड करण्यात आलीय. कांबळे यांच्या पक्षप्रवेशानंतर एकनाथ शिंदेंनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ठाकरेंवर हल्लाबोल केला. काही लोकांची दुकाने बंद झाली. काही लोक डांबराची दुरुस्ती करत होती. एसटीपी देखील झालं नाही. समुद्रातील पाणी एकदम शुद्ध होणार आहे, अनेक निर्णय घेतले.
रेसकोरस येथे मोठे उद्यान होत आहे. आम्ही फक्त निवडणुकीपुरती आठवण करत नाही. तर काही लोक निवडणुका आल्या की मुंबई तोडणार अशी बतावणी करतात. पण कोणाचाही बाप महाराष्ट्रापासून तोडणार नाही. काहीजण कोविडच्या काळात मुंबईला सोन्याची अंडी देणारी समजत होते. माझ्यामुळे काही लोक बाहेर फिरायला लागले आहेत, असा टोला एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना लगावला.
यावेळी शिंदेंनी सरकारने केलेल्या कामांचा पाढा वाचला. आपल्याला काम करायचे आहे. मी तुमच्या पाठीशी आहे. अडीच वर्षापूर्वी पाहिले. जनतेच्या भल्यासाठी केले. आम्ही कामातून उत्तर देतो. ज्यांनी आरोप केले, त्याला जागा दाखवली. जे काम करतातात त्यांना लोकांनी आशीर्वाद दिला. मरीन ड्राइव्ह येथे देखील बगीचा होत आहे. मुंबईकर बाहेर फेकला गेला त्याचा विचार केला पाहिजे. मुंबईकर पुन्हा मुंबई येथे अन्यायाचा आहे. लोकांनी निवडून दिले आहे, त्याच्यासाठी काय केलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.