Maharashtra Politics Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: महाविकास आघाडीला मोठं खिंडार, अनेक बडे नेते, संरपंचांसह पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

Mahvikas Aghadi: शहापूरमध्ये महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना ठाकरे गट, शरद पवार गट आणि काँग्रेसमधील अनेक नेते आणि पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला . त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठा धक्का मानला जात आहे.

Priya More

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. अनेक राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश करत आहेत. पदाधिकाऱ्यांचे इनकमिंक आणि आऊटगोईंग सुरूच आहे. राज्यात महाविकास आघाडीला महायुतीकडून एकापाठोपाठ एक धक्के बसत आहेत. अशामध्ये शहापूर तालुक्यामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. या तिन्ही पक्षांच्या अनेक बडे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपचे कमळ हाती घेतल.

मिळालेल्या माहितीनुसार, शहापूर तालुक्यातील शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट तसेच काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. शहापूर तालुका उबाठा सेनेच्या आदिवासी आघाडीचे अध्यक्ष आणि शिरोळचे सरपंच संतोष आरे यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे गटाच्या अनेक कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपामध्ये प्रवेश केलेल्यांमध्ये शहापूर पंचायत समितीचे ४ माजी सदस्य, १२ सरपंच, ८ माजी सरपंच तसेच अनेक ग्रामपंचायत सदस्यांचा समावेश आहे.

पंचायत समिती माजी सदस्य एकनाथ भला, दत्ता हंबीर, पिंटू फसाले, संदीप थोराड, दहीगावचे सरपंच भास्कर आरे, तळवाडा सरपंच अंकुश वरतड, तुकाराम वाख, किसन मांगे, मारुती साठे, शरद पवार गटाचे अमित हरड, सचिन सातपुते, समीर खंडवी, निखील सातपुते या सर्वांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

रविंद्र चव्हाण यांनी सर्वांचे भाजपमध्ये स्वागत केले. त्यांनी सांगितले की, 'विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अहोरात्र झटत आहेत. जनजाती समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत शासकीय योजना आणि प्रत्येक वाडी वस्तीपर्यंत रस्त्यांचे जाळे उभारण्यासाठी प्रयत्नशील आहेत. आज ज्या विश्वासाने या सर्वांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. अपेक्षेपेक्षा अधिक विकास या परिसराचा आम्ही करून दाखवू .'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

WhatsApp: व्हॉट्सअ‍ॅपवर ऑनलाईन आहात; मित्रांनाही कळणार नाही, करा 'ही' एक सेटिंग

Santosh Juvekar: हिंदी नाटकानंतर संतोष जुवेकर लवकरच झळकणार नव्या चित्रपटात; साकारणार ही महत्वाची भूमिका

Maharashtra Live News Update: आमदार गोपीचंद पडळकररांकडून जयंत पाटलांवर खालच्या पातळीवर गंभीर टीका

Tulja Bhawani Temple : तुळजाभवानी मंदिर परिसरात एआय कॅमेरे; नवरात्रोत्सवात होणार प्रथमच वापर

Crime : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी योगा प्रशिक्षकाला अटक; POCSO अंतर्गत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT