Uday Samant raises questions on action against Dhaygawkar; demands same rule for Ganesh Naik, sparking fresh Mahayuti tension. saamtv
महाराष्ट्र

Mahayuti Tension: रवींद्र धंगेकरांवर कारवाई होणार, तर नवी मुंबईतील तोच नियम लागणार; नाईकांबाबत काय म्हणाले उदय सामंत?

Uday Samant Targets Ganesh Naik: मंत्री उदय सामंत यांनी रवींद्र धंगेकर यांच्यावरील कारवाईच्या मागणीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. जर धंगेकर यांच्यावर कारवाई केली तर नवी मुंबईतील गणेश नाईक यांनाही हाच नियम लागू करावा लागेल, असं सामंत म्हणालेत. यामुळे महायुती वाढत्या फूटचे संकेत मिळत आहेत.

Bharat Jadhav

  • उदय सामंत यांनी गणेश नाईक यांच्याविरोधातही तोच नियम लावावा अशी मागणी केली आहे.

  • पुण्यानंतर नवी मुंबईतही महायुतीत तणाव वाढण्याची शक्यता आहे.

  • रवींद्र धंगेकरांवर कारवाईची चर्चा सुरू आहे.

महायुतीत आलबेल नसल्याचं दिसून येत आहे. पुण्यानंतर आता नवी मुंबईत भाजप आणि शिवसेना नेते आमनेसामने आले आहेत. पुण्यात जैन बोर्डिंग प्रकरणात धंगेकर यांनी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर आरोप केले. त्यानंतर महायुतीत तणाव निर्माण झाला. मोहोळ यांच्यावर आरोप केल्यामुळे भाजप नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली. त्यानंतर एकनाथ शिंदेंनी धंगेकर यांना समज दिली होती.

आता त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याची चर्चा आहे. याचदरम्यान शिवसेनेचे आमदार आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी नवी मुबंईचा मुद्दा उपस्थित करत नवीन वादाला सुरूवात केलीय. आरोप केले म्हणून धंगेकर यांच्यावर कारवाई केली तर नवी मुंबईतही गणेश नाईक यांनाही तोच नियम लागू करावा लागेल, असं सूचक विधान सामंत यांनी केलं. त्यामुळे महायुतीत वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

धंगेकरांच्या कारवाईबाबत काय म्हणाले उदय सामंत

रवींद्र धंगेकर यांच्या सोबत आपण स्वतः बोलणार आहोत. त्यांना भेटायला जाणार आहोत. त्यांनी संयम बाळगला पाहिजे, तसा बाकीच्या नेत्यांनीही बाळगला पाहिजे. “धंगेकर यांच्यावर कारवाई करायची असेल, तर मग नवी मुंबईत काय घडलं हेही पाहावं लागेल. कोणी सुरुवात केली हे सर्वांना माहिती आहे,” असे म्हणत उद्योग मंत्री उदय सामंत यांनी अप्रत्यक्ष वनमंत्री गणेश नाईकांवर निशाणा साधलाय.

काही दिवसांपासून शेलक्या शब्दात गणेश नाईक यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल करत आहेत. दुसरीकडे मंत्री मोहोळ यांच्यावर आरोप केल्यामुळे धंगेकर यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होतीय. त्यामुळे जर पुण्यात तो नियम लागू केला तर तोच नियम नाईकांवरही लागू होईल, असे संकेत उदय सामंत दिलेत. जैन बोर्डिंग प्रकरणात धंगेकर यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे संबंधित जागेच्या व्यवहाराला धर्मादाय आयुक्तांकडून स्थगिती देण्यात आलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! नवले पुलाजवळ भरधाव कंटेनरने अनेक वाहनांना उडवलं, ४ जणांचा मृत्यू

Black Dark Lips: ओठांवरचा काळपटपणा कसा दूर कराल? या जादुई टिप्स वाचा

काँग्रेस उमेदवाराची कमाल, डिपॉझिट म्हणून चिल्लर भरली; निवडणूक अधिकारीही चक्रावले|VIDEO

Maharashtra Live News Update: पुणे -बंगळुरू महामार्गावर भयंकर अपघात, कंटेनरची एकमेकांना धडक

Yami Gautam: कॉन्ट्रास्ट फॅशनचा नवा ट्रेंड, कश्मिरी ब्यूटी यामी गौतमचा पिंक ड्रेस लूक व्हायरल, पाहा PHOTO

SCROLL FOR NEXT