मनसेचे दोन उमेदवार ऐन निवडणुकीत गायब
२४ तासांपासून कुटुंबीयांशी कोणताही संपर्क नाही
केडगाव परिसर संवेदनशील असल्याचा दावा
सुशील थोरात, साम प्रतिनिधी
महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले मनसेचे दोन उमेदवार गायब झालेत.२४ तासांपासून उमेदवारांचा त्यांच्या कुटुंबाशी संपर्क झाला नाहीये. या घटनेने अहिल्यानगरमध्ये खळबळ उडाली आहे. दोन उमेदवार गायब झालेल्याची माहिती मनसे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ आणि सुमित वर्मा यांनी दिलीय. दरम्यान केडगाव भाग हा संवेदनशील असल्याने निवडणूक बिनविरोध होण्यासाठी दोन उमेदवारांचे अपहरण केले असावे असा संशय विद्यार्थी सेनेच्या जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांनी व्यक्त केलाय.
राहुल जाधव आणि अंबरनाथ भालसिंग असे गायब झालेल्या उमेदवारांची नावे आहेत. याप्रकरणी मनसेचे पदाधिकारी तक्रार दाखल करण्यासाठी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेत. पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन केली तपासाची मागणी केली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार,दोन उमेदवारांपैकी एक उमेदवार भारतीय जनता पार्टी आणि दुसरा उमेदवार अजित पवार गटाच्या उमेदवाराविरुद्ध निवडणुकीच्या रिंगणता होते. राहुल जाधव आणि अंबरनाथ भालसिंग हे प्रभाग क्रमांक सतरामधील उमेदवार आहेत.
विद्यार्थी सेनेच्या जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा म्हणाले की, मनसेचे दोन्ही उमेदवार २४ तासांपासून गायब आहेत. आम्ही पक्ष कार्यालयात तपास केला तेव्हा ते प्रचारासाठी पक्षाचे साहित्य घेऊन गेले. परंतु ते प्रचारालाही गेले नाहीत. ना घरी गेले. त्यांच्या कुटुंबीयांचे फोन आम्हाला येत आहेत. त्यांच्या मुलांचे काही बरेवाईट झालं तर जबाबदार कोण असा सवाल ते करत आहेत.
केडगावचा इतिहास पाहिला तर हा प्रभाग संवेदनशील आहे. तेथे रक्तरंजित निवडणुका झाल्या आहेत. त्यामुळे अशा पद्धतीने कोणी दहशत करत असले तर केडगावकरांनी विचार केला पाहिजे, दरवेळी निवडणुका आल्या तर अशा प्रकारे दहशत माजवली जातेय. त्यातून चांगल्या लोकांना घाबरवून सोडलं जातं. त्यामुळे केडगावकरांनी या गोष्टी डोक्यात घ्याव्यात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.