Chandrahar Patil saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील ठाकरे गटात; सांगलीच्या आखाड्यात उतरणार, उद्धव ठाकरेंनी मागितलं वचन

Maharashtra Politics : आज डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. मातोश्री येथे जाऊन त्यांनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ठाकरे गटाची मशाल हाती घेतली. यावेळी खासदार संजय राऊत देखील उपस्थित होते. एका शेतकऱ्याच्या मुलाला एवढा मान मिळाला यामुळे चंद्रहार पाटील यांनी उद्धव ठाकरे यांचे आभार मानले.

Bharat Jadhav

Double Maharashtra Kesari Chandrahar Patil join Thackeray Group :

महाराष्ट्र केसरीचा दुहेरी किताब मिळविलेले पैलवान चंद्रहार पाटील यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. मातोश्रीवर जाऊन चंद्रहार पाटील यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि हाती मशाल घेतलं आहे. उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील यांचा प्रवेश करून घेत त्यांना लोकसभेची उमेदवारी देखील जाहीर केली. (Latest News)

ठाकरे गटात (Thackeray Group) प्रवेश करण्याआधी चंद्रहार पाटील यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना गदा दिली. शेतकऱ्याच्या मुलाला एवढा मान मिळाल्याच पाहून चंद्रहार पाटील यांनी उद्धव ठाकरे यांचे आभार मानले. कुस्ती क्षेत्रात काम करत असताना बोलून दाखवण्यापेक्षा करून दाखवायची सवय आहे. यामुळे जास्त बोलणार नाही, पण येणाऱ्या लोकसभा निवडणुकीचा महाराष्ट्रातला सांगली जिल्ह्याचा हा पहिला निकाल असेल असा, विश्वास चंद्रहार पाटील यांनी व्यक्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे आंदोलन

Drishyam 3 Cast Fee: 'दृश्यम 3'च्या स्टारकास्टची फी किती? अजय देवगणला तब्बूपेक्षा 528% अधिक मानधन

Pumpkin seeds: कोलेस्ट्रॉल मेणासारखं वितळेल आणि हार्ट अटॅकचा धोकाही होईल कमी, रोज सकाळी खा मूठभर 'या' बिया

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव स्कूल बसची दुचाकीला धडक, विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

Political News : राजकीय वर्तुळात मोठी घडामोड! काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा, 'या' नेत्याकडे दिली जबाबदारी

SCROLL FOR NEXT