Maharashtra Politics News: सुनील तटकरे, धनंजय मुंडेंसह १२ नेते भाजप प्रवेश करणार... अतुल लोंढे यांच्या दाव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra Politics Latest News: लोकसभा निवडणुका जशजशा जवळ येतील तशा राज्याच्या राजकारणात मोठ्या नाट्यमय घडामोडी पाहायला मिळत आहे. अशातच काँग्रेस नेते अतुल लोंढे यांच्या एका ट्वीटने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
Maharashtra Politics News: Sunil Tatkare Dhananjay Munde  will join BJP Big Claims by Congress Leader Atul Londhe | Saam Tv
Maharashtra Politics News: Sunil Tatkare Dhananjay Munde will join BJP Big Claims by Congress Leader Atul Londhe | Saam TvSaamtv

Atul Londhe News:

लोकसभा निवडणुका (Loksabha Election) जशजशा जवळ येतील तशा राज्याच्या राजकारणात मोठ्या नाट्यमय घडामोडी पाहायला मिळत आहे. अशातच काँग्रेस नेते, प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांच्या एका ट्वीटने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सुनील तटकरे, धनंजय मुंडेंसह अजित दादा गटाचे १२ नेते भाजपात प्रवेश करणार असल्याचा दावा काँग्रेसचे नेते अतुल लोंंढे यांनी केला आहे. एक्स माध्यमावर ट्वीट करत अतुल लोंढे यांनी हा सर्वात मोठा दावा केला आहे.

काय म्हणालेत अतुल लोंढे?

"धोके पे धोका….ऐसा कोई सगा नहीं जिसे भाजपाने ठगा नही! सुनिल तटकरे, धनंजय मुंडे यांच्या नेतृत्त्वाखाली मंत्री आदिती तटकरे, सुनिल शेळके यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे १२ बडे नेते, मंत्री आमदार लवकरच भाजपात प्रवेश करणार, असे अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी त्यांच्या एक्स माध्यमावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) यांच्या शिल्लक राहिलेल्या राष्ट्रवादीचा दुसरा गट शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीत जाणार! अजित दादा बहुतेक एकटेच त्यांच्या पक्षात राहणार," असेही त्यांनी या ट्वीटमध्ये म्हटले आहे. सध्या त्यांच्या या ट्वीटने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Maharashtra Politics News: Sunil Tatkare Dhananjay Munde  will join BJP Big Claims by Congress Leader Atul Londhe | Saam Tv
Wardha Cyber Crime : ऑनलाइन फसवणुकीचा नवा फंडा; मुलगा गंभीर गुन्ह्यात, पोलिस असल्याची बतावणी करत पैशांची मागणी
Atul Londhe X Post
Atul Londhe X PostAtul Londhe Patil @ X Account

निलेश लंकेंच्या प्रवेशाची अफवा; स्वतःच केला खुलासा!

दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून राष्ट्रवादीचे पारनेरचे आमदार निलेश लंके हे शरद पवार यांच्यासोबत जाणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. लवकरच निलेश लंके हे शरद पवार (Sharad Pawar) गटात प्रवेश करणार आहेत, असे सांगण्यात येत होते. मात्र या सर्व अफवा असल्याचे सांगत मी अजित दादांसोबतच आहे... असे स्पष्टीकरण स्वतः निलेश लंके यांनी दिले आहे. (Latest Marathi News)

Maharashtra Politics News: Sunil Tatkare Dhananjay Munde  will join BJP Big Claims by Congress Leader Atul Londhe | Saam Tv
Sangli Water Crisis: सांगली जिल्ह्याला दुष्काळाच्या झळा; काँग्रेसचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com