महायुती सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये स्थान न मिळाल्यामुळे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ नाराज झाले आहेत. छगन भुजबळांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे त्यांचे समर्थक, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी आणि ओबीसी नेते आक्रमक झाले आहेत. यावरून बुलडाणा आणि नाशिकमधील ओबीसीचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून आंदोलन करत आहेत. अशामध्ये ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. 'अजित पवारांनी छगन भुजबळांवर अन्याय केला.', असे मत त्यांनी व्यक्त केले.
महायुतीमध्ये अनेक नेत्यांना मंत्रिपद न दिल्यामुळे नाराजीनाट्य सुरू आहे. यावर प्रतिक्रिया देताना लक्ष्मण हाके यांनी सांगितले की, 'छगन भुजबळ आणि गोपीचंद पडळकर यांना मंत्रिपद नाकारलं हा ओबीसींचा अपमान आहे. अजित पवारांनी छगन भुजबळांना का डावलं याच्या मागचं कारण म्हणजे रोहित पवारांना, जयंत पाटील यांना सत्तेत घ्यायचं आहे.
'ओबीसीचे आरक्षण टिकवणं महत्त्वाचं आहे. ओबीसीच्या समोर अनेक प्रश्न समोर असताना भुजबळांना मंत्रिमंडळातून वगळले आहे. अजित पवारांना जयंत पाटील आणि रोहित पवार यांना मंत्रिमंडळात स्थान द्यायचे आहे म्हणून त्यांच्यावरती अन्याय केला.' असा आरोप लक्ष्मण हाके यांनी केला आहे.
तसचं, 'मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मी लवकरच भेट घेऊन ओबीसीच्या मागण्यांसंदर्भात चर्चा करणार आहे. ठामपणे महायुतीच्या बाजूने ओबीसी उभा राहिला. सामाजिक न्यायासाठी ओबीसीचा आरक्षण टिकलं पाहिजे. बोगस ओबीसीच्या नोंदी रद्द केल्या पाहिजेत. पंचायत राजमधील ओबीसींचे आरक्षण टिकलं पाहिजे.', असे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी लक्ष्मण हाके यांनी छत्रपती संभाजी भोसले यांच्यावर देखील टीका केली. 'संभाजी भोसलेंचा जीपीएस भरकटला आहे. संभाजी भोसले कोण आहेत? संभाजी भोसले यांची एक ओळख होती. संभाजी भोसले ग्रामपंचायतच्या निवडणुकीत पण जाऊन उभे राहतील. तिसरी आघाडी दुर्बिणीने शोधा कुठे राहिली आहे. लक्ष्मण हाकेंनी ज्या उमेदवारांच्या सभा घेतल्या त्यांना तिसऱ्या आघाडीतील उमेदवारांपेक्षा जास्त मतं आहेत.', अशी टीका त्यांनी केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.