Ratnagiri Assembly Election 2024 Saam Tv
महाराष्ट्र

Ratnagiri Politics: अबब! रत्नागिरीत एकाच नावाचे ३-३ उमेदवार, मतदारांचा गोंधळ उडणार

Maharashtra Assembly Election 2024: रत्नागिरीतील ३ मतदारसंघामध्ये एकाच नावाचे एक-दोन नाही तर तब्बल तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

Priya More

विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच रंगतदार झाले आहे. निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत मंगळवारी संपली. सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. राज्यातील अनेक महत्वाच्या मतदारसंघाकडे राज्याचे लक्ष लागले आहे. याठिकाणी जोरदार लढत पाहायला मिळणार आहे. कोकणातील दापोली विधानसभा मतदारसंघ यापैकी एक आहे. यंदा विधानसभा निवडणुकीमध्ये रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार लढत होणार आहे. रत्नागिरीतील ३ मतदारसंघामध्ये एकाच नावाचे एक-दोन नाही तर तब्बल तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरीच्या दापोली विधानसभा मतदारसंघात एकाच नावाचे तीन-तीन उमेदवार निवडणूक लढवणार आहे. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे संजय कदम यांच्या नावात साधर्म्य असलेले दोन संजय कदम अपक्ष म्हणून विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तर शिंदेंच्या शिवसेनेकडून उभे असलेल्या योगेश रामदास कदम यांच्या नावाचे साधर्म्य असलेले दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. दापोली विधानसभा मतदारसंघातील मतदारांना संभ्रमात टाकण्यासाठी दोन्ही बाजूंनी एकाच नावाच्या व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.

शिवसेना उद्धव ठाकरे गटातील एकाच नावाचे उमेदवार -

संजय वसंत कदम (शिवसेना ठाकरे गट)

संजय संभाजी कदम(अपक्ष)

संजय सिताराम कदम (अपक्ष)

शिवसेना शिंदे गटातील एकाच नावाचे उमेदवार -

योगेश रामदास कदम (शिवसेना शिंदे गट)

योगेश रामदास कदम (अपक्ष)

योगेश विठ्ठल कदम (अपक्ष)

चिपळूण मतदारसंघातील एकाच नावाचे उमेदवार -

शेखर गोविंदराव निकम

शेखर गंगाराम निकम

प्रशांत बबन यादव

प्रशांत भगवान यादव

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Shoking : मुंबई हादरली ! १५ वर्षीय मुलीवर जन्मदात्या वडिलांकडून मुलीवर बलात्कार, आईचाही समावेश

Shravana 2025: श्रावणात शिवलिंग पूजा करताना 'या' ७ वस्तू टाळा, होऊ शकतो अपशकुन

Liver cirrhosis last stage: लिव्हर सिरोसिसच्या लास्ट स्टेजमध्ये शरीरात होतात 'हे' मोठे बदल; यकृत सडण्याची लक्षणं वेळीच ओळखा

HBD Ranveer Singh : रणवीर सिंहचं ५ सुपरहिट चित्रपट, पहिला सिनेमा कोणता?

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT