'देवेंद्र फडणवीसांच्या चेहऱ्यावरचं हास्य हे अधिक विकृत मानसिकतेचं होतं.', अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी केली आहे. सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. सांगलीच्या जत विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांच्यासाठी महायुतीची प्रचारसभा झाली. या प्रचारसभेत सदाभाऊ खोत यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते.
या प्रचारसभेच्या मंचावर देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. सदाभाऊ खोत हे शरद पवारांबाबत वक्तव्य करत होते त्यावेळी देवेंद्र फडणवीस हसत होते. यावरूनच आता अमोल कोल्हे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांबद्दल केलेल्या वक्तव्याचा अमोल कोल्हे यांनी खरपूस समाचार घेतला आहे.
अमोल कोल्हे यांनी सांगितले की, 'ज्या व्यक्तीने हे वक्तव्य केलं त्या व्यक्तीचं नाव घ्यायची सुद्धा इच्छा होत नाही. पण ज्यावेळी हे वक्तव्य केलं गेलं तेव्हा व्यासपीठावर बसलेल्या देवेंद्र फडणवीसांच्या चेहऱ्यावरचं हास्य हे अधिक विकृत मानसिकतेचं होतं.', अशा शब्दात खासदार अमोल कोल्हे यांनी सदाभाऊ खोत आणि देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला. जुन्नर येथील महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यशील शेरकर यांच्या प्रचारावेळी अमोल कोल्हे यांनी हे वक्तव्य केले.
सांगलीतील प्रचारसभेमध्ये महायुतीमधील घटक पक्षाचे नेते सदाभाऊ खोत हे देखील सहभागी झाले होते. इतर नेत्यांप्रमाणे सदाभाऊ खोत यांनी देखील विरोधी पक्षांवर हल्लाबोल केला. मात्र त्यानंतर त्यांनी शरद पवारांवर निशाणा साधण्यास सुरुवात केली. पण त्याची जीभ घसरली. 'शरद पवार यांना ९ महिने लागले आणि कळा फुटल्या. पण शरद पवारांना मानावं लागेल. शरद पवार सांगत सुटले आहेत की, मला महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलायचा आहे. त्यांना कसला चेहरा बदलायचा आहे. तुमच्या चेहऱ्यासारखा महाराष्ट्र घडवायचा आहे का?, अशा शब्दात सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर टीका केली. शरद पवारांबाबत केलेल्या वादग्रस्त टीकेवरून आता सदाभाऊ खोत यांच्यावर जोरादर टीका होत आहे. शरद पवार गटाने पुण्यात आंदोलन देखील केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.