Maharashtra Politics : सरकारची वाट लावल्याशिवाय शांत बसणार नाही, मनोज जरांगे आक्रमक, फडणवीसांवर हल्लाबोल

Maharashtra Assembly Election 2024 : मनोज जरांगी पाटील यांनी आपली भूमिका जाहीर करत देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेचा बाण सोडला. मनोज जरांगे पटील यांनी अंतरवाली सराटीमधून रणशिंग फुंकले.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil Saam TV
Published On

Manoj Jarange Patil: मराठा समाजासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथून रणशिंग फुंकलेय. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी आपला निर्णय घेतलाय. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले.

अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा नीच माणूस नसल्याची टीका जरांगे यांनी केली. सोयीनुसार मराठ्यांचा वापर केल्याचा आरोपही यावेळी केली. तसेच मुस्लिम आणि आपण एकत्र आले पाहिजे, अशी सादही त्यांनी यावेळी घातली. महविकस आघाडी आणि महायुती तुमचे राजकारण खड्ड्यात जाऊ द्या, असेही जरांगे म्हणाले.

मुलांसाठी उठाव केला -

ज्या विषयाला आपल्याला हात घालण्याची गरज नव्हती. ती वेळ आपल्यावर आली आहे. हा संघर्ष राजकारणासाठी नव्हता. गरजवंत मराठ्यांची राजकारण करायची गरजच नव्हती. मुलांसाठी उठाव केला. राजकारण करायचे आमच्या मनाला कधी शिवलेही नाही. मी कट्टर हिंदू आहे. मुस्लिम आणि आपण एकत्र आलो पाहिजे.

हिंदूमध्ये मराठा आहे की नाही?

माझा एक प्रश्न आहे. हिंदूमध्ये मराठा आहे की नाही? मारामार्‍या करायच्या, दंगल करायची कामे करायची, असली की मराठा पाहिजे. आणि पुन्हा म्हणायचे हिंदू खतरे मे है असे म्हणता. मराठा हिंदू आहे. तोच मराठा अडचणीत सापडला की मग काय बोलता. मग हिंदूला एक मराठा मोठा झाला पाहिजे असे का म्हणत नाही? असा संतप्त सवाल जरांगे पाटील यांनी उपस्थित केला.

तुमच्या सोईनुसार मराठ्यांना वापरता. मराठ्यांनी कुणाच्या मागे जायचं नाही. आपलेच ५०-५५ टक्के आहेत. दलीत, मुस्लिम यांच्या अंगावर जायचे नाही. हा बदल आपल्याला करायला पाहिजे. आपल्या तापट बुद्धीचा यांनी फायदा उचलला.
मनोज जरांगे पाटील

देवेंद्र फडणवीसांना डोकं, मेंदू आहे की नाही?

मला माझा मराठ्याचं भले करायचे आहे. त्यांना करायच्या आहेत दंगली. मी म्हणलो असतो तर प्रत्येक गावात मारामारी झाल्या आहेत. देवेंद्र फडणवीसांना डोकं, मेंदू आहे की नाही? असा हल्लाबोल यावेळी मनोज जरांगे यांनी केला. मराठ्यांनी ठरवले असते तर प्रत्येक गावात दररोज मारामारी झाल्या असते. ते आपल्याला करायचे नाही. परंतु खोड्या केल्या जातात, असेही जरांगे म्हणाले.

आपण आरक्षण मागत असताना दुसऱ्याला द्यायची गरज नव्हती. फडणवीस इतका क्रूर जगात माणूस असू शकतं नाही. आपण ओबीसीतून आरक्षण मागतोय. सगे सोयरे आरक्षण मागतोय. यातले १४ महिन्यात एकही काम केले नाही.

देवेंद्र फडणवीस यांनी खून्नस काढली आहे. ज्या जाती आरक्षणात जाऊ शकत नाही. मागणी नाही. आंदोलन नाही तरीही १७ जाती आरक्षणात घातल्या.यात भाजपची चूक नाही, पण फडणवीस यांनी केले. फडणवीस इतका नीच आणि द्वेशी माणूस देशाने पाहिला नाही.
मनोज जरांगे पाटील

देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे समितीला काम करु दिलं नाही

शिंदे समितीला देवेंद्र फडणवीस यांनी काम करू दिले नाही. नेमके दिलं काय? शेतकऱ्यांनी मागितली कर्जमुक्ती मागितली; दिली नाही. शेतकऱ्यांनी हमी भाव मागितला नाही दिली. २४ तास लाईट मागितली; नाही दिली. देवेंद्र फडणवस यांनी सगळे सोडून १५०० द्यायचे काम केले. आयुष्यासाठी आम्ही आरक्षण मागितले ते दिले नाही. शेतीमालाला भाव द्या म्हणून मागणी केली जाते दिली जात नाही. महविकस आघाडी आणि महायुती तुमचे राजकारण खड्ड्यात जाऊ द्या, असे मनोज जरांगे म्हणाले.

१०० टक्के मतदान करा, डाव उधळून टाकू

एसईबीसी आरक्षणासारखे १५०० चे झाले आहे. आता लाडक्या बहिणीने दांडगा दंडका घेऊन धक्का द्या. ते चाब्रे आहेत. आता दिवाळीत फसवेल. शिदा देईल, असे जरांगे म्हणाले. आता रडणे नाही तर मतदान करा. १०० टक्के मतदान करा, देशाच्या इतिहासात सर्वाधिक मतदान झाले पाहिजे. मतदानातून याचे सगळे डाव उधळून टाकायचे आहेत. निवडणुकी रोजी आपला गाव आपण सांभाळायचे. मतदान याद्या पाहायच्या. दुसरे नाव आले की बघायचे. असेही जरांगे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com