chinchwad assembly constituency Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: अजितदादांनी शब्द फिरवला, भाजपचा प्रचार करणार नाही; चिंचवडमध्ये राष्ट्रवादी कार्यकर्ते आक्रमक

Chinchwad Assembly Constituency: महायुतीची चिंचवड विधानसभेची जागा भाजपला गेल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पदाधिकारी नाराज झाले आहेत. त्यांनी भाजपचा प्रचार न करण्याचा निर्णय घेतला आहे.

Priya More

गोपाळ मोटघरे, पिंपरी-चिंचवड

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी प्रत्येक पक्षाकडून जाहीर केली जात आहे. काही पक्षांनी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. महायुतीमधील भाजपने रविवारी ९९ उमेदवारांची यादी जाहीर केली. भाजप उमेदवारांची यादी झाल्यानंतर नारजी नाट्याला सुरूवात झाली. उमेदवारीसाठी इच्छुक असणारे भाजपचे काही जण नाराज झाले आहेत. तर काही इतर पक्षाचे पदाधिकारी देखील नाराज झाले आहेत. अशातच महायुतीची चिंचवड विधानसभेची जागा भाजपला गेल्यामुळे अजितदादांनी दिलेला शब्द फिरवला, असं म्हणत चिंचवडच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी थेट अजित पवारांना घरचा आहेर दिलाय.

रविवारी चिंचवड विधानसभेत महायुतीने भाजपच्या शंकर जगतापांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर मतदारसंघातील राजकीय घडामोडींना वेग आलाय. चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीकडून नाना काटे आणि प्रशांत शितोळे हे इच्छुक उमेदवार होते. पण त्यांना तिकीट न मिळाल्यामुळे ते नाराज झाले आहेत. नाराज झालेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटाने काही तासांतच एक बैठक बोलावत थेट अजित पवारांबाबत नाराजीचा सूर आळवला आहे. काहीही झालं तरी आम्हाला भाजपचा प्रचार करायचा नाही, त्यामुळं महाविकास आघाडी आमच्यातील ज्याला उमेदवारी देईल, आम्ही त्यांचाच प्रचार करु. अशी बंडाची भूमिका अजित पवारांच्या समर्थकांनी घेतलीये.

या बैठकीत नाना काटे, प्रशांत शितोळे, मयूर कलाटे या इच्छुक उमेदवारांसह माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली. दोन दिवसांत पुढची भूमिका जाहीर करण्याचा निर्णय या बैठकीत एकमताने घेण्यात आला आहे. त्यामुळे चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे टेन्शन वाढले आहे. आता नाराज अजित पवार गट नेमकी काय भूमिका घेतंय? किंवा या सर्वांची नाराजी दूर केली जातेय की नाही? हे पाहणं महत्वाचे ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Face Care: आठवड्यातून किती वेळा फेस स्क्रब केलं पाहिजे?

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Marathi bhasha Vijay Live Updates : लाडक्या बहिणीचं पोर्टल बंद, आता नव्याने नोंदणी होणार नाही - ठाकरे

Raj-Uddhav Thackeray Photo: राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र, मराठी माणसाला जे हवं तेच झालं, पाहा PHOTO

Marathi Bhasha Mumbai Worli Dome: जे बाळासाहेबांना जमलं नाही, ते फडणवीसांना जमलं - राज ठाकरेंचा टोला | VIDEO

SCROLL FOR NEXT