Jalna Assembly Constituency Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: जालन्यात गोरंट्याल विरुद्ध खोतकर रंगणार संघर्ष?

Priya More

अक्षय शिंदे, जालना

विधानसभा निवडणुकीचं पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. त्यातच जालना मतदारसंघात पारंपरिक प्रतिस्पर्धी आमने-सामने येणार आहेत. जालन्यात गोरंट्याल विरुद्ध खोतकर यांच्यामध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये संघर्ष रंगणार आहे. गोरंट्याल-खोतकरांसमोर बंडखोरांचं मोठं आव्हान असणार आहे. जालन्याची लढत कोणासाठी किती कठीण असणार आहे? आणि जातीय समीकरणं कुणाच्या पथ्यावर पडणार? याबद्दल आपण जाणून घेणार आहोत...

विधानसभा निवडणूकीचे बिगूल वाजलंय. त्यातच जालना विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे कैलास गोरंट्याल विरुद्ध शिंदे गटाचे अर्जून खोतकर यांच्यात पारंपरिक सामना रंगणार आहे. मात्र या मतदारसंघातून गोरंट्याल आणि खोतकरांनी विजयाचा विश्वास व्यक्त केलाय. आमदार नसताना कामं केल्याने लोकांचा पाठींबा असल्याचे मत अर्जुन खोतकर यांनी व्यक्त केले आहे. तर, सेक्युलर मतांच्या विभाजनासाठी विरोधकांचा डाव असल्याचे कैलास गोरंट्याल यांनी सांगितले.

महायुती आणि महाविकास आघाडीत जागा वाटपावरून धुसफुस सुरु असताना काँग्रेसच्या अब्दुल हाफिज यांनी कैलास गोरंट्याल यांच्याविरोधात दंड थोपटलेत. स्टील सिटी आणि बियाण्यांची पंढरी असलेल्या जालन्यातून तीन वेळा गोरंट्याल तर ४ वेळा खोतकरांनी विजय मिळवलाय. मात्र २०१९ च्या निवडणूकीचं चित्र काय होतं याबद्दल देखील आपण जाणून घेणार आहोत.

२०१९ विधानसभेचा निकाल -

- कैलास गोरंट्याल - काँग्रेस - ९१,८३५ मतं

- अर्जुन खोतकर, शिंदे गट - ६६,४९७ मतं

- २५ हजार मतांनी गोरंट्याल विजयी

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा केंद्रबिंदू जालना जिल्हा असला तरी जालना विधानसभा मतदारसंघात त्याचा थेट परिणाम होण्याची शक्यता कमी आहे. त्याचं कारण जालन्यातील जातीय समीकरणात आहे. जालन्यामध्ये मराठा मतांची संख्या ५० हजार आहे. तर,

ओबीसी समाजाचं मतदान ९० हजार, मुस्लिम समाजाचं मतदान ६४ हजार, दलित समाजाचं मतदान ६० हजार आहे. त्याचसोबत, ब्राह्मण, सिंधी, गुजराती समाजाचं मतदान ५५ हजार आहे. १९९० पासून सातत्याने काँग्रेस आणि शिवसेनेत होणाऱ्या जालन्याच्या पारंपरिक लढतीत यंदा इच्छूकांमुळे चुरस निर्माण झालीय.

जालन्यात इच्छूकांची भाऊगर्दी -

कैलास गोरंट्याल, आमदार, काँग्रेस

अर्जून खोतकर, इच्छूक, शिंदे गट

अरविंद चव्हाण, इच्छूक, राष्ट्रवादी (AP)

डेव्हिड धुमारे, उमेदवार, वंचित

अब्दुल हाफिज, इच्छूक, काँग्रेस

भास्कर दानवे, इच्छूक, भाजप

सामाजिक धृवीकरणाचं केंद्र हे जालना असल्याने नागरिक कुणाच्या पारड्यात मतांचं दान टाकणार? याबरोबरच बंडखोरांची बंडखोरी नमवण्यात गोरंट्याल यशस्वी ठरणार की खोतकर यावर आमदारकीचं समीकरण ठरणार आहे. यंदा जालन्यामध्ये कोणत्या पक्षाला सत्ता स्थापन करण्यात यश येतंय हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MLA Babanrao Shinde : मोहिते - शिंदे यांच्यातला पंधरा वर्षांचा वाद मिटणार ?

Nandurbar News : विधानसभेत पिता-पुत्र आमनेसामने; शहादा- तळोदा मतदारसंघात रंगणार लढत

Maharashtra News Live Updates : शिवसेना उमेदवारांची यादी आज होणार प्रसिद्ध? ६० ते ७५ उमेदवारांच्या नावांची होऊ शकते घोषणा

Suzie Bates ची भन्नाट स्टोरी! बास्केटबॉलपटूने न्यूझीलंडला टी-२० वर्ल्डकप जिंकून दिलं

Nana Patole: भाजप विधानसभा निवडणुकीत राज्यात २० ते ३० जागांच्यावर जाणार नाही, नाना पटोले यांचा मोठा दावा

SCROLL FOR NEXT