Maharashtra Election: भाजप विधानसभा निवडणुकीत २० ते ३० जागांच्यावर जाणार नाही, नाना पटोलेंचा मोठा दावा

Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीत भाजप २० ते ३० जागांच्यावर जाणार नाही, असा दावा नाना पटोले यांनी केला आहे.

भाजपला महाराष्ट्रात पराभवाची भीती आहे. त्यांचा रिपोर्टही तसाच आहे. २० ते ३० जागांच्या वर भाजप महाराष्ट्रात जाणार नाही, असा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. माध्यमांशी संवाद साधताना ते असं म्हणाले आहेत. महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत माहिती देताना ते म्हणाले की, ''जवळपास ९६ जागांवर आज आमची चर्चा झाली. आजच्या जागा सीईसीमध्ये मांडू. आघाडीतील जागांबाबत आज चर्चा झाली नाही.''

नाना पटोले पुढे म्हणाले की, ''भाजप वाद लावायचं काम करत आहे. संजय राऊत यांनी कोणाचीही भेट घेतली नाही. राज्यात महविकास आघाडीचं सरकार येणार. विदर्भातील काही जागांवर अजून वाटाघाटी सुरू आहे. स्वबळावर लढण्याची आम्ही कुठलीही इच्छा व्यक्त केली नाही. उद्या आम्ही शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करू.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com