Suvarna Pachpute  Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: भाजपची ९९ उमेदवारांची पहिली यादी, अहमदनगरमध्ये नाराजी नाट्य; बंडखोरीचा इशारा

Priya More

सुशील थोरात, अहमदनगर

भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी आपली पहिली यादी जाहीर केली. देवेंद्र फडणवीसांनी ९९ उमेदवारांची यादी जाहीर केली. भाजपने उमेदवारी जाहीर केल्यानंतर अनेक इच्छुक नेत्यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे ते नाराज झाले आहेत. काहींनी उघडपणे नाराजी जाहीर केली तर काहींच्या डोळ्यात अश्रू आले. पक्षाच्या निर्णयावर त्यांनी नाराजी देखील व्यक्त केली. त्यापैकी एक विधानसभा मतदारसंघ म्हणजे श्रीगोंदा. याठिकाणी भाजपकडून निवडणूक लढवण्यासाठी सुवर्णा पाचपुते इच्छुक होत्या. पण त्यांना पक्षाने उमेदवारी दिली नाही त्यामुळे त्या चांगल्याच नाराज झाल्या आहेत.

भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर होताच अनेक विधानसभा मतदारसंघात नाराजी नाट्य पाहायला मिळत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून इच्छुक असलेल्या सुवर्णा पाचपुते यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांच्या डोळ्यात अश्रू पाहायला मिळाले. उमेदवारी न मिळाल्यामुळे त्या प्रचंड नाराज झाल्या असून त्यांनी आता अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

'मूळ भाजपच्या कार्यकर्त्यांना सोडून भाजपने उमेदवारी न देता बाहेरून आलेल्या प्रस्थापितांनाच पक्ष उमेदवारी देत आहे. पक्ष धृतराष्ट्रासारखा झाला आहे.', असं म्हणत सुवर्णा पाचपुते यांनी पक्षावर जोरदार टीका केली. सोबतच, सुवर्णा पाचपुते यांनी आपल्या कार्यालयातील भाजप नेत्यांचे फोटो आणि चिन्ह हटवले आहे. मात्र भाजपचे चिन्ह कार्यालयातून हटवताना त्यांना भरून आल्याचे त्यांनी सांगितले. भाजपने तिकीट न दिल्यामुळे नाराज झालेल्या सुवर्णा पाचपुतेंनी भाजपविरोधात दंड थोपटले आहे. त्यांनी ही निवडणूक लढण्याचा निर्धार केला आहे. पक्षाला माझी ताकद दाखवून देण्यासाठी मी अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: परिवर्तन महाशक्तीची पहिली उमेदवार यादी जाहीर, मुख्यमंत्र्यांच्या विरोधात उमेदवार देणार

Sangli Vidhan Sabha : सांगलीत भाजप नेत्याचीकडूनच बंडखोरी; अपक्ष लढविणार निवडणूक

Sanjay Raut : शिवसेना स्वाभिमानाशी तडजोड करणार नाही; संजय राऊतांचा इशारा कुणाला? VIDEO

Shweta Tiwari: काळजाला भिडणारं सौंदर्य

Online Shopping Scams :ऑनलाईन खरेदी करताय? या ५ गोष्टी ठेवा लक्षात, नाही तर होऊ शकतं मोठं नुकसान

SCROLL FOR NEXT