Beed Political News Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: अर्ज माघारी घे नाही तर..., भाजप उमेदवाराकडून काँग्रेसच्या उमेदवाराला जीवे मारण्याची धमकी

Beed Political News: बीडमध्ये नगराध्यक्षपदाच्या भाजप उमेदवाराने काँग्रेसच्या उमेदवाराला जीवे मारण्याची धमकी दिली. घरी जाऊन अर्ज मागे घे असं सांगत ही धमकी देण्यात आली. या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आले.

Priya More

Summary -

  • बीडच्या गेवराईमध्ये भाजप उमेदवाराकडून काँग्रेस उमेदवाराला जीवे मारण्याची धमकी

  • अर्ज मागे घेण्यासाठी घरी येऊन धमकी देण्यात आली

  • काँग्रेसच्या संजीवनी चाळक यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली

  • निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेवराईत राजकीय वातावरण तापले

योगेश काशिद, बीड

राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले. आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. कुठे काही उमेदवार स्वत:हून उमेदवारी अर्ज मागे घेत आहेत. तर काही उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी विनंती केली जात आहे. पण बीडमध्ये उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी भाजपच्या उमेदवाराने काँग्रेसच्या उमेदवाराला घरी जाऊन जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेमुळे बीडच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

भाजपाचे गेवराईचे उमेदवार गीता पवार यांच्याकडून काँग्रेसच्या उमेदवारांना थेट घरी जाऊन जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. उमेदवारी अर्ज माघारी घ्या म्हणत थेट धमकी देण्यात आली. काँग्रेसच्या उमेदवार संजीवनी चाळक यांनी थेट भाजपाच्या उमेदवार गीता पवार यांच्याविरोधात गेवराई पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस करत आहेत.

बीडच्या गेवराईमध्ये भाजपने माजी आमदार लक्ष्मण पवार यांच्या भाऊजई गीता पवार यांना नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी तिकीट दिले. गीता पवार यांच्याविरोधात काँग्रेसने संजीवनी चाळक यांना उमेदवारी दिली. गेवराईमध्ये गीता पवार आणि संजीवनी चाळक यांच्यात काँटे की टक्कर सुरू आहे. पण अर्ज मागे घेण्याच्या तारखेच्या आदल्या रात्री गीता पवार यांनी संजीवनी चाळक यांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यांनी संजीवनी यांच्या घरी जाऊन अर्ज मागे घेण्यासाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. सध्या बीडमध्ये या घटनेची चर्चा होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashes 2025-26: W,W,W,W,W,W,W... स्टार्कच्या वादळात इंग्लंडची दाणादाण, फक्त १७२ धावात उडाला खुर्दा

Maharashtra Live News Update : मावळात दोन्हीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रित

Samsung India: गुड न्यूज! सॅमसंग गॅलेक्सी टॅब A11+ भारतात लॉन्चसाठी तयार; जाणून घ्या तारीख

Accident : ताम्हिणी घाटात भयंकर घडलं! ६ जिवलग मित्रांचा मृत्यू, 'त्या' हॉटेलचालकामुळे उलगडला अपघाताचा थरार

Kitchen Hacks : कांदा चिरताना तुमचे डोळे पाणावतात ? मग फॉलो करा या सिक्रेट टिप्स

SCROLL FOR NEXT