सुप्रिम म्हसकर, साम टीव्ही, प्रतिनिधी
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर उत्तर महाराष्ट्र आणि नाशिकमध्ये काँग्रेसला खिळखिळं करण्याचं काम भाजपने सुरु केलयं. ठाकरे सेनेतील मात्तबर नेत्यांना गळाला लावल्यानंतर भाजपने आपला मोर्चा 70 वर्षांपासून कॉंग्रेसशी एकनिष्ठ असलेल्या पाटील घराण्याकडे वळवलाय.. धुळ्यातील काँग्रेसच्या कुणाल पाटलांना भाजपनं गळाला लावलंय...तर कुंपणच शेत खात असल्याची प्रतिक्रीया काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी व्यक्त केलीय...
1 जुलैला कुणाल पाटलांचा भाजप प्रवेश होणार आहे... धुळ्यातून तब्बल 700 कार्यकर्त्यांचा ताफा पक्षप्रवेशासाठी मुंबईत दाखल होणार आहे.. खान्देशात काँग्रेसला खिंडार पाडणारे कुणाल पाटील कोण आहेत? पाहूयात...
काँग्रेसची घराणी भाजपच्या दारात
- पाटील घराणं कॉंग्रेसशी एकनिष्ठ
- रोहिदास पाटील 70 वर्षांपासून काँग्रेससोबत
- भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधीची पाटील यांच्या निवास्थानी भेट
- कुणाल पाटील यांचेही राहुल गांधींशी चांगले संबंध
- कुणाल पाटलांचा भाजप प्रवेश राहुल गांधीसह काँग्रेसला धक्का
फक्त कुणाल पाटीलच नाही तर गेल्या 11 वर्षात काँग्रेसमधील दिग्गज घराण्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय...
काँग्रेसची घराणी भाजपच्या दारात
- अहिल्यानगरचे विखे पिता-पुत्र भाजपात
- नांदेडच्या अशोक चव्हाणांचा कुटुंबासह भाजपात पक्षप्रवेश
- सांगलीच्या वसंतदादांच्या नातसून जयश्री पाटील भाजपात
- भोरमधील थोपटे घराण्यातील संग्राम थोपटे भाजपात
- लातूरच्या शिवराज चाकूरकरांच्या सूनबाई अर्चना भाजपात
- धाराशिवचे बसवराज मुरुमकर मुलासह भाजपात
राज्यातील सहकार, शिक्षण क्षेत्रात वर्चस्व असलेल्या आणि काँग्रेसने अनेक मोठ्या संधी देऊनही या घराण्यांनी भाजपचं मांडलिकत्व का स्वीकारलंय? ही घराणी भाजपच्या दावणीला का बांधली गेली आहेत? त्यामागे भाजपच्या दबावाचं राजकारण राजकारण आहे की काँग्रेसमधील नेतृत्वाची पक्षावरील ढिली झालेली पकड? याचा विचार व्हायला हवा..
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.