Ajit Pawar, Chhagan Bhujbal, Praful Patel Saam Tv
महाराष्ट्र

Praful Patel News: विधानसभेला राष्ट्रवादीच्या वाट्याला किती जागा येणार? प्रफुल पटेलांनी मोठा आकडा सांगितला; म्हणाले...

Maharashtra Assembly Election 2024: विधानसभेत लोकसभेसारखी फरफट होऊ द्यायची नाही, असे राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ यांनी आधीच स्पष्ट केले आहे. त्यानंतर आता प्रफुल पटेल यांनी राष्ट्रवादी किती जिंकणार याचा थेट आकडाच सांगून टाकला आहे.

Gangappa Pujari

शुभम देशमुख, गोंदिया|ता. १६ जून २०२४

लोकसभा निवडणुकांमध्ये जागा वाटपावरुन झालेली रस्सीखेच अन् त्यानंतर अवघ्या चार जागा मिळालेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटाने विधानसभेला मात्र सावध पवित्रा घेतला आहे. विधानसभेत लोकसभेसारखी फरफट होऊ द्यायची नाही, असे राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ यांनी आधीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे विधानसभेला राष्ट्रवादी नेमकी किती जागा लढणार? याबाबत चर्चा सुरू असतानाच आता प्रफुल पटेल यांनी थेट मोठा आकडा सांगून टाकला आहे.

काय म्हणाले प्रफुल पटेल?

लोकसभा निवडणूक संपल्यानंतर विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. अशातच महायुतीमध्येदेखील आता जागा वाटपाचे गणितं जुळवू लागले आहेत. गोंदिया मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत प्रफुल पटेल यांना विचारले असता जुन्या राष्ट्रवादीच्या पकडून आमच्याकडे एकूण 57 आमदार होते. ही गोष्ट लक्षात घेता आम्ही विधानसभेत 85 ते 90 जागा मागणार आहोत, असे स्पष्ट केले आहे.

तसेच "लवकरच महाराष्ट्रात मंत्रिमंडळ विस्तार होणार आणि जी पद खाली आहेत त्या ठिकाणी विस्तार करून वाचलेल्या महिन्यात चांगल्या जोमाने काम करता येणार आहे असे प्रफुल पटेल यांनी सांगितले. केंद्रामध्ये राष्ट्रवादीच्या कोट्यात जर कॅबिनेट मंत्रीपद आले तर ते मलाच मिळणार," योग्य वेळ आल्यावर योग्य निर्णय होईल असा दावाही प्रफुल पटेल यांनी केला.

दरम्यान, लोकसभा निवडणुकांसारखी परिस्थिती विधानसभेला नसेल. आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये परिस्थिती काहीतरी वेगळी राहील विधानसभा निवडणुकीमध्ये पिक्चर बदलेल असं वक्तव्य राष्ट्रवादी नेते प्रफुल पटेल यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Moringa Leaves Chutney Recipe: कडू वाटली तरी पौष्टिक! उन्हाळ्यात सोप्या पद्धतीने बनवा शेवग्याच्या पानांची झणझणीत चटणी

Maharashtra News Live Update : मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी, प्रवाशांचे हाल

जत्रेला जाणाऱ्या भक्तांवर काळाचा घाला; भरधाव वाहन ७०० मीटर खोल दरीत कोसळलं, २० जणांचा मृत्यू

Cricket controversy: धक्कादायक! आंघोळ करताना महिलांचे व्हिडीओ काढले, दोन खेळाडूंना अटक; क्रिकेट विश्व हादरले

Farmer ID Update : ...तर शेतकऱ्यांना कोणत्याच सुविधा मिळणार नाही; राज्य सरकारने 'फार्मर आयडी'बाबत घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT