operation tiger in maharashtra Saam tv
महाराष्ट्र

ठाकरेंपाठोपाठ पवारांचेही खासदार फुटणार? राष्ट्रवादीचे 3 खासदार NDAच्या संपर्कात?

operation tiger in maharashtra : ऑपरेशन टायगरनंतर आता ऑपरेशन तुतारीची चर्चा सुरु झाली आहे. ठाकरेंपाठोपाठ शरद पवारांचेही खासदार फुटणार अशी शक्यता वर्तवली जातेय. राष्ट्रवादीचे किती खासदार फुटणार ? कोण राबवणार आहे हे ऑपरेशन ? पाहूया एक रिपोर्ट....

Girish Nikam

जून महिन्यात पावसाने ओढ दिली असली तरी राज्यात राजकीय घडामोडींचा मात्र महापूर आलाय. ठाकरेसेनेच्या 6 खासदारांनी वेगळा गट स्थापन केल्यानंतर आता राज्यात ऑपरेशन तुतारी सुरू झाल्याची चर्चा आहे. शरद पवारांचे 3 खासदार NDAच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आठ खासदार आहेत.

ठाकरेंपाठोपाठ पवारांचेही खासदार फुटणार ?

सुप्रिया सुळे (बारामती)

डॉ. अमोल कोल्हे (शिरुर)

निलेश लंके (अहिल्यानगर)

धैर्यशील मोहिते-पाटील (माढा)

बजरंग सोनवणे (बीड)

अमर काळे (वर्धा)

भास्कर भगरे (दिंडोरी)

सुरेश म्हात्रे (भिवंडी)

फुटीच्या राजकारणामुळे महाविकास आघाडीत चलबिचल आहे. ऑपरेशन टायगरनंतर ऑपरेशन तुतारी राबवलं जाण्याची चर्चा आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना विचारले असता त्यांनी याबाबतचं वृत्त फेटाळून लावलंय.

फोडाफोडीच्या राजकारणामागे एनडीए नेतृत्वाची भविष्यातील राजकीय गणित लपून राहिली नाहीत. राष्ट्रवादीच्या खासदारांच्या भूमिकेकडे आता राज्याचं लक्ष आहे.

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर 2024 च्या लोकसभा निवडणूकीत मविआत शरद पवारांनी 10 जागा लढवून 8 जागांवर यश मिळवलं होतं. आता तुतारीवर निवडून आलेले खासदार ठाकरेसेनेप्रमाणेच फुटणार की पवारांशी निष्ठा ठेवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT