ajit pawar group meeting  Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: भाजपचा हा सर्वात मोठा डाव, सुनेत्रा पवारांच्या शपथविधीनंतर बच्चू कडूंचं खळबळजनक विधान

Bacchu Kadu Criticized BJP: सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शनिवारी शपथ घेतली. या शपथविधीनंतर प्रहार जनशक्तीचे नेते बच्चू कडू यांनी खळबळजनक विधान केले. भाजपचा हा सर्वात मोठा डाव, असल्याचा आरोप त्यांनी केला.

Priya More

Summary -

  • सुनेत्रा पवारांच्या शपथविधीनंतर बच्चू कडू यांनी भाजपवर मोठा आरोप केला

  • राष्ट्रवादीच्या तीन बड्या नेत्यांच्या ईडी फाईल भाजपकडे असल्याचा दावा

  • लातूर येथील प्रचार सभेत त्यांनी खळबळजनक विधान केले

प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी खळबळजनक विधान केले. त्यांनी राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांवर हल्लाबोल केला. 'राष्ट्रवादीचे तीन बडे नेते जरी राष्ट्रवादीत असले तरी ते भाजपाच्या इशारावर चालतात. कारण या तीन बड्या नेत्यांच्या ईडीच्या फाईल भाजपकडे अडकल्या आहेत.', असं मोठं विधान त्यांनी केले. तसंच, सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर 'हा भाजपचा मोठा डाव', असल्याचा आरोप त्यांनी केला. ते लातूर येथे प्रहारच्या जिल्हा परिषद उमेदवाराच्या प्रचार सभेसाठी आले होते. त्यावेळी त्यांनी हे विधान केले.

बच्चू कडू यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, 'राष्ट्रवादीच्या ३ बड्या नेत्यांच्या ईडीच्या फाईल तयार आहेत. आजच्या शपथविधीमुळे अजितदादांबद्दलची सहानुभूती मागे पडताना दिसत आहे. भाजपाने मोठा डाव खेळला आहे. अंत्यविधीला चार दिवस होत नाहीत, त्यामुळे पुष्पगुच्छ घेऊन जायचं की, सांत्वन करायला जायचं हा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे. शेवटी सुनेत्रा पवार यांना माझ्या शुभेच्छा आहेत. कारण या दुःखाच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली हे एका दृष्टीने धाडस आहे. आणि याच धाडसाने त्यांनी सामान्य माणसाच्या पाठीशी उभं रहावे.'

अजित पवार यांच्या निधनामुळे राज्याला मोठा धक्का बसला. बारामतीमध्ये २८ जानेवारीला झालेल्या विमान अपघातामध्ये त्यांचा मृ्त्यू झाला होता. अजित पवार हे बारामती दौऱ्यासाठी विमानाने जात होते. त्याचवेळी त्यांचे विमान बारामती विमानतळाजवळ कोसळले. या विमान अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह ५ जणांचा मृत्यू झाला होता. अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला होता. त्यानंतर शनिवारी सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

अजित पवार यांच्या निधनानंतर बच्चू कडू यांनी शोक व्यक्त केला होता. 'अजितदादांचं अचानकपणे निधन झालं ही अतिशय दुखद घटना आहे. अतिशय धाडसी, स्पष्ट, परखड, कामाचा माणूस आणि कार्यकर्त्यांसाठी धावणारा माणूस म्हणून अजितदादांची ओळख होती. अजितदादांच्या या दुःखद निधनाने मोठा झटका बसला.', असे म्हणत बच्चू कडू यांनी अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vinchu Home Remedies : घरात विंचू येण्याने त्रस्त आहात? हे ४ उपाय करतील कायमचा बंदोबस्त

मंत्रिमंडळात फेरफार की नेतृत्वबदल? मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री दोघांना दिल्लीचा निरोप, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Maharashtra News Live Update: नीट पेपरफुटी प्रकरण; पुण्यातील आणखी प्राध्यापक सीबीआयच्या रडारवर?

Saree Storage Tips: पैठणी ते साधी साडी; पाहा साडीची घडी नक्की कशी घालायची, साड्या घडीवर कधीच नाही फाटणार

जम्मू-काश्मीरमध्ये रोपवे हवेत अचानक बंद, ३०० पर्यटक अडकले; रेस्क्यू ऑपरेशन जारी

SCROLL FOR NEXT