Uddhav Thackeray-Eknath Shinde Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Politics : 'टकमक टोका'वरून टोकाचं राजकारण; उद्धव ठाकरेंना शिंदे गटाच्या बड्या नेत्याचं प्रत्युत्तर

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde : उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेनंतर ठाकरे गट आणि शिंदे गटात 'टकमक टोका'वरून राजकारण सुरू झालं आहे.

Nandkumar Joshi

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde Politics :

उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेनंतर ठाकरे गट आणि शिंदे गटात 'टकमक टोका'चं राजकारण सुरू झालं आहे. शिंदे गटाचे नेते आणि आमदार भरत गोगावले यांनी उद्धव ठाकरेंवर टीकेची तोफ डागली आहे. टकमक टोक तुम्ही पाहिला आहे का? असा खोचक सवालही त्यांनी केला.

महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या प्रचंड घडामोडी घडत आहेत. निवडणुकांच्या घोषणा होण्याआधीच राजकीय वातावरण तापलं आहे. राजकीय पक्षांचे नेते एकमेकांवर टीका करत आहेत.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. शिवसेनेत उभी फूट पडल्यापासून उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटात विस्तवही जात नाही. दोन्हीकडून टीकेचे बाण सोडले जात असून, एकमेकांना घायाळ करण्याची एकही संधी सोडत नाहीत.

रायगडमधील एका कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी CM एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांवर तोफ डागली होती. सध्याच्या राजकारणाचं वैशिष्ट्य म्हणजे टकमक टोक आहे, असं ते म्हणाले होते.

जे गुन्हेगार आहेत, गद्दारी करणारे आहेत, त्यांना महाराज जसे रायगड किल्ल्यावरील टकमक टोक दाखवायचे, तसं आताच्या राजकारणात येथील गद्दारांना टकमक टोक दाखवण्याची वेळ आली आहे, असा नेम ठाकरेंनी शिंदे गटाच्या नेत्यांवर साधला होता. या टीकेला शिंदे गटाचे नेते गोगावले यांनी उत्तर दिलं आहे.

भरत गोगावलेंचे प्रत्युत्तर

उद्धव ठाकरेंच्या टीकेला गोगावले यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले. कडेलोटासाठी त्यांनी आधी टकमक टोक पाहिला आहे का? असा रोखठोक सवाल गोगावले यांनी केला.

रायगड किल्ला चढून जाण्याची ज्यांच्यात धमक आहे, तेच हे करू शकतात. रायगड किल्ला चढून जाण्यासाठी त्यांच्याकडे कोण आहे? जोपर्यंत आमची नितिमत्ता आणि नियती चांगली आहे, तोपर्यंत कुणीच कडेलोट करू शकणार नाही, असं जोरदार प्रत्युत्तर गोगावले यांनी दिलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali 2026 : दिवाळीच्या फराळात वापरला जाणारा खवा शुद्ध की भेसळयुक्त? कसे ओळखाल

Maharashtra News Live Update: मिठाई खवा आदींची डिलिव्हरी घेताना त्यावर दिलेली मुद्दत तपासून पाहावे - तुकाराम मुंढे

सर्वाधिक गोल करणाऱ्या 'किंग'चा फुटबॉलला अलविदा; रोनाल्डोची आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती,चाहत्यांना अश्रू अनावर

MSRTC Employees diwali bonus 2026 : एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी जोरात; एकाच वेळी बोनस, अॅडव्हान्स आणि महागाई भत्त्याची घोषणा

Train Travel Rules: प्रवासात बॅग ट्रेनमध्ये विसरलात? घाबरू नका, 'या' सोप्या पद्धतीने परत मिळेल तुमचे सामान

SCROLL FOR NEXT