महाराष्ट्र

Maharashtra Politics : शरद पवारांचा पुन्हा नवा डाव; आरोग्यमंत्री तानाजी सावंतांना जबरदस्त धक्का, पडद्यामागं काय घडलं?

Maharashtra Politics: राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांचे पुतणे हे शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. विधानसेभेत त्यांना उमेदवारी हवी असल्याने त्यांनी हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे.

Bharat Jadhav

Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात मोठ्या उलथापालथ होतायत. लोकसभेनंतर विधानसभेत महायुतीला धोबी पछाड देण्यासाठी राजकारणातील उस्ताद म्हणवले जाणाऱ्या शरद पवारांनी आणखी एक डाव टाकलाय. यावेळी त्यांनी शिवसेनेचे नेते डॉ. तानाजी सावंत यांना मोठा धक्का दिलाय. तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करून घेत तानाजी सावंत यांना धक्का देणार आहेत.

शिवसेनेत फुट पाडण्याआधी तानाजी यांनी शरद पवार यांच्यावर हल्लाबोल चढवला होता. आता शरद पवार यांनी तानाजी सावंत यांना धोबीपछाड देत मोठा धक्का दिलाय. मिळालेल्या माहितीनुसार, तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत पितृपक्षानंतर शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचं म्हटलं जात आहे.

आरोग्यमंत्री डॉ.तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वाटेवर आहेत. पितृपक्ष पंधरवाडा संपल्यानंतर पक्ष प्रवेश मुहूर्त ठरल्याची माहिती निकटवर्तीयांकडून मिळालीय. अनिल सावंत यांनी यापूर्वीच शरद पवार यांची भेट घेऊन उमेदवाराची मागणी केली आहे. त्यांच्या मागणी शरद पवार गटाकडून मान्य केली गेली असल्याचं म्हटलं जात आहे.

सुत्रानुसार, अनिल सावंत तुतारी घेऊन पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. मतदारसंघात सावंत यांचे गावभेट दौरे आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. अनिल सावंत मंगळवेढा येथील भैरवनाथ शुगर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष आहेत.

धर्मराव बाबा आत्राम यांच्या मुलीचा शरद पवार गटात प्रवेश

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार खूप सक्रीय झालेत. शिवसेनेत सुरुंग लावण्याआधी शरद पवार यांनी गट अजित पवार गटाला एकामागून एक धक्का दिलेत. मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांची मुलगी भाग्यश्री आत्राम यांनी शरद पवार गटात प्रवेश अजित पवार गटाला मोठा धक्क दिला. भाग्यश्री आत्राम यांना शरद पवार गटात प्रवेश करू नये म्हणून अजित पवारांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. परंतु भाग्यश्री आत्राम यांनी आपला निर्णय कायम ठेवत अजित पवार गटाला सोडचिठ्ठी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips For Watch: वास्तुनुसार, घरात घड्याळ कोणत्या दिशेला लावावे?

Monday Horoscope Update : 'या' राशीच्या व्यक्तीने जोडीदाराचा सल्ला घ्यायला विसरु नका, वाचा उद्याचे राशीभविष्य

Mangal Budh Yuti 2025: सावधान! मंगळ-बुध ग्रहाची युती,पाच राशींवर येणार संकट

Pune Crime : दारू पिण्यावरुन वाद, थोरल्या भावाने धाकट्या भावाचा केला खून; पुण्यात भयंकर घडलं

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र कुस्तीगिर परिषदेच्या अध्यक्षपदी आमदार रोहित पवार यांची बिनविरोध निवड

SCROLL FOR NEXT