Mahayuti Guardian Minister Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : पालकमंत्रिपदाचा तिढा कधी सुटणार? फडणवीस सरकारमधील बड्या नेत्याने केलं मोठं विधान

Guardian Minister in Maharashtra : मंत्रिमंडळ विस्तारानंतर महायुती सरकारसमोर पालकमंत्रिपदाचा तिढा निर्माण झाला. महायुतीतील तिन्ही पक्षांकडून हा तिढा सोडवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

Yash Shirke

Maharashtra Politics : महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून पालकमंत्री पदाचा तिढा कायम आहे. जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरुन अनेक नेत्यांमध्ये संघर्ष असल्याचे पाहायला मिळते. मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर आता पालकमंत्रीपदासंबंधित निर्णय घेण्याचे आव्हान महायुती सरकारसमोर आहे. दरम्यान राज्याचे नवे पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी या प्रकरणावर भाष्य केले आहे. त्यांनी हा तिढा दोन दिवसांमध्ये सुटेल असे म्हटले आहे.

मंत्रिमंडळामध्ये गुलाबराव पाटील यांच्याकडे पाणी पुरवठा खात्याची जबाबदारी देण्यात आली. त्यांनी नुकतेच आपल्या खात्याचा पदभार स्विकारला. पाणी पुरवठा खात्याचा पदभार घेतल्यानंतर त्यांनी कामाची पाहणी केली. माध्यमांना दिलेल्या मुलाखतींमध्ये त्यांनी "पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभरात विविध जिल्ह्यांमध्ये भेटी देण्याचा माझा मानस आहे. तसेच राज्यातील रखडलेल्या प्रकल्पांची देखील मी माहिती घेणार आहे. सर्व प्रकल्प पुढील सहा महिन्यात कार्यान्वित करण्याचा माझा प्रयत्न राहील. काही ठिकाणी ठेकेदारांमुळे प्रकल्प रखडलेले आहेत, त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई केली जाईल" असे म्हटले.

दरम्यान माध्यमांशी संवाद साधताना गुलाबराव पाटील यांना पालकमंत्रीपदाच्या विस्ताराविषयी प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर देताना गुलाबरावांनी 'तीन पक्षांचे मिळून सरकार आहे. त्यामुळे तिन्ही पक्षाचे नेते एकत्रित मिळून जो निर्णय घेतील, तो आम्हाला सगळ्यांना मान्य राहील. मला वाटतं पुढील दोन दिवसात पालकमंत्री पदाचा तिढा सुटेल' असे विधान केले.

याशिवाय गुलाबराव पाटील यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणावरही भाष्य केले. "पोलीस त्यांच्या पद्धतीने कारवाई करत आहे. आता सर्वांनी या प्रकरणात संयम धरला पाहिजे आणि आरोपींना कडक शिक्षा कशी होईल?, याकडे लक्ष दिले पाहिजे", असे गुलाबराव यांनी म्हटले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Election Commission: 'मतचोरीच्या खोट्या आरोपांना निवडणूक आयोग घाबरत नाही',: मुख्य निवडणूक आयुक्त

Vaishno Devi Yatra: वैष्णो देवीची यात्रा पूर्णपणे थांबवली, भाविकांना परत जाण्याचे आवाहन; नेमकं कारण काय?

Maharashtra Live News Update: पेशवे जयंतीनिमित्त रॅली मध्ये सहभाग घेत खासदार मेधा कुलकर्णी यांनी चालवली दुचाकी

Priya Bapat: प्रिया बापटचा स्पेशल बॉसी लूक; लवकरच झळकणार नव्या भूमिका

Asia Cup 2025 : आशिया कपसाठी पाकिस्तानी संघाची घोषणा, PCB चा बाबर आझम-मोहम्मद रिझवानला धक्का

SCROLL FOR NEXT