Maharashtra Politics 2024  Saam Digital
महाराष्ट्र

Maharashtra Politics: शिंदे, फडणवीस अन् पवारांची पुन्हा दिल्लीवारी, आता तरी तिढा सुटणार का?

Maharashtra New Chief Minister (CM): महाराष्ट्राच्या नव्या सरकारचा शपथविधीची तारीख जाहीर झालेली आहे, पण अद्याप मुख्यमंत्री कोण असेल, हे गुलदस्त्यातच आहे. आज एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार पुन्हा एकदा दिल्लीला जाणार आहेत.

Namdeo Kumbhar

Maharashtra government formation: महायुतीच्या सरकार स्थापनेचा मुहूर्त ठरलाय, पण मुख्यमंत्री कोण (Oath-taking ceremony of the new CM of Maharashtra would be held on December 5, 2024 at Azad Maidan) होणार? मंत्रिमंडळात कोण कोण? कोणाला कोणती खाती मिळणार? याबाबत अद्याप कोणताही माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे नेमकं घोडं कुठं अडलं? असा सवाल विरोधकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. मुख्यमंत्री भाजपचाच असेल, यावर शिक्कामोर्तब झालेय. पण गृहमंत्रालय आणि इतर महत्त्वाच्या खात्यावरुन महायुतीमध्ये बोलणी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

महायुतीमधील खातेवाटपचा तिढा आता दिल्लीमध्ये सुटण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस व अजित पवार आज पुन्हा दिल्लीला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दिल्लीमध्ये अमित शाह आणि जेपी नड्डा यांच्यासोबत महाराष्ट्रातील तिन्ही वरिष्ठ नेत्यांची बैठक होणार असल्याची माहिती मिळत आहे. दिल्ली दौऱ्यात महायुतीमधील तिढा सुटणार का? याची चर्चा सुरू आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज अमित शाह यांच्यासोबत पुन्हा बैठक होऊन अंतिम निर्णय होणार आहे. येत्या २४ तासांत खातेवाटपावर अंतिम शिक्कामोर्तब होईल, असे राजकीय विश्लेषकांनी सांगितलेय.

भाजपचा गटनेता कधी ठरणार?

भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक केव्हा होईल यासंदर्भात अजूनही संभ्रम आहे. अद्यापपर्यंत भाजपच्या आमदारांना बैठक केव्हा होईल याबद्दल कुठलाही निरोप आलेला नाही. शपथविधी 5 डिसेंबरला होईल, हे निश्चित झाल्यानंतर विधिमंडळ पक्षाची बैठक 2 डिसेंबर किंवा तीन डिसेंबरला होईल अशी शक्यता होती. मात्र आमदारांना त्या संदर्भातले अजून कोणताही निरोप नाही. त्यामुळे बरेचसे आमदार त्यांच्या त्यांच्या मतदारसंघात आहेत. त्यामुळे विधिमंडळ पक्षाची बैठक उद्या दुपारनंतरच होण्याची शक्यता आहे. आज देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार आहे. अमित शाह यांच्यासोबत होणार्‍या बैठकीत काय निर्णय होतोय? याची चर्चा सुरू झाली.

शिंदेंकडून आमदारांची तातडीची बैठक

काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथछ शिंदे यांनी शिवसेना आमदाराची बैठक बोलवली आहे. आज दुपारी ही महत्वाची बैठक वर्षा किंवा नंदनवनला होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या बैठकीत मुख्यमंत्री जागावाटप त्याच बरोबर महायुतीतील आपल्या सहभागाबाबत आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत.

शिवसेनेच्या वाट्याला १३ मंत्रीपद येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यात काही जुने ज्येष्ठ नेत्यांना संधी दिली जाणार असून मंत्री मंडळात शिवसेनेकडून काही नव्या चेहर्यांनाही संधी दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT