Maharashtra Politics  x
महाराष्ट्र

Maharashtra Politics : काँग्रेसला मोठा धक्का, बडा नेता करणार अजित पवार गटात प्रवेश

Maharashtra Political News : काँग्रेसला धक्क्यांवर धक्के बसत आहेत. काँग्रेसचे राहुल पाटील यांनी अजित पवार गटात प्रवेश केला. आता गोकुळचे माजी अध्यक्षदेखील अजित पवार गटात जाणार आहेत.

Yash Shirke

  • काँग्रेसला कोल्हापूरमध्ये धक्क्यांवर धक्के बसत आहेत.

  • काँग्रेसचे राहुल पाटील यांनी राष्ट्रवादी (AP) पक्षात प्रवेश केला.

  • आता आणखी एक नेता अजित पवार गटात जाणार आहे.

Maharashtra : कोल्हापूरचे दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांचे सुपुत्र राहुल पाटील यांनी काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात राहुल पाटील यांनी प्रवेश केला. राहुल पाटील यांच्यासह हातकणंगले तालुक्यातील काँग्रेस पी. एन. पाटील गटानेदेखील राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला.

राहुल पाटील आणि पाटील गटातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी काँग्रेसची साथ सोडून राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केल्याने काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला. राहुल पाटील यांच्यानंतर आणखी एक नेता राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे काँग्रेसची कोल्हापुरात ताकद कमी झाल्याचे म्हटले जात आहे.

गोकुळचे माजी अध्यक्ष आणि संचालक असलेले अरुण डोंगळे हे लवकरच अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. ५ सप्टेंबर रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये अरुण डोंगळे यांचा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती समोर आली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाची शक्ती वाढत आहे.

अरुण डोंगळे हे शिवसेना शिंदे गटामध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. ते एकनाथ शिंदे यांच्या सपंर्कात देखील होते. पण राहुल पाटील यांच्या पक्षप्रवेशाच्या वेळी अजित पवारांसह डोंगळे स्टेजवर दिसले. आता अरुण डोंगळे हे अजित पवार गटात जाणार असल्याचे पक्कं झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: शरद पवार भाकरी फिरवणार? आबांच्या मुलाला मिळणार मोठी जबाबदारी

Jio Special Offer: जिओची सुपरहिट ऑफर! ३३६ दिवसांसाठी सिम अ‍ॅक्टिव्ह राहील, Unlimited कॉलिंगसह धमाल बेनिफिट्स

Maharashtra Cough Syrup Alert : यवतमाळ हादरलं! विषारी कफ सिरपमुळे ६ वर्षीय मुलाचा मृत्यू, परिसरात संतापाची लाट

Bhandara Tourism : घनदाट जंगल अन् उंच डोंगरांमध्ये वसलाय किल्ला, दिवाळीत भंडारा जिल्ह्यात ट्रिप प्लान करा

Pune : पुण्यात खाकीच असुरक्षित, वाहतूक पोलिसाला नाका-तोंडातून रक्त येईपर्यंत मारलं

SCROLL FOR NEXT