Ramdas Kadam Gajanan Kirtikar Saamtv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: तिकीट वाटपाआधीच शिंदे गटात वाद उफाळला; लोकसभा उमेदवारीवरुन गजानन किर्तीकरांनी रामदास कदमांना सुनावले

Maharashtra Politial News: मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघावर शिवसेना नेते रामदास कदम यांनी दावा सांगितल्याने शिंदे गटातील वाद चव्हाट्यावर आला आहे.

Gangappa Pujari

संजय गडदे, प्रतिनिधी

Ramdas Kadam Vs Gajanan Kirtikar:

लोकसभा तसेच विधानसभा निवडणूकांना अजून अवकाश आहे. त्याआधीच शिवसेना शिंदे गटातील नेत्यांमध्ये जागा वाटपावरुन चांगलीच जुंपल्यांची पाहायला मिळाले. मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघावर शिवसेना नेते रामदास कदम यांनी दावा सांगितला. ज्यानंतर गजानन किर्तीकर आणि रामदास कदम यांच्यामध्ये कलगितुरा चांगलाच कलगितुरा रंगला.

शिवसेना नेते गजानन किर्तीकर (Gajanan Kirtikar) यांचे वय झाले असून ते निवडणूक लढवणार नसतील तर सिद्धेश रामदास कदम हे मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवतील असे वक्तव्य रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्याला गजानन किर्तीकर यांनी जोरदार प्रत्यूत्तर दिले आहे.

"वय जरी झाले असले तरी दिल, दिमाग और शरीर आज भी तंदुरुस्त है असे म्हणत येणारी 2024 ची लोकसभा निवडणूक आपणच लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. शिवाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून त्यांचे पुत्र अमोल कीर्तिकर हे उमेदवार नसतील असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

तसेच यावेळी पुढे बोलताना "माझ्या मतदारसंघात गेल्या 10 वर्षापासून माझा संपर्क आहे. लोकांशी संपर्क ठेवल्याने आणि काम केल्याने माझीही व्होटबँक तयार झाली आहे. त्यामुळे ही सीट कोणत्याही परिस्थितीत जिंकून आणण्यासाठी मला निवडणूक लढावी लागणार आहे... असेही गजानन किर्तीकर (Gajanan Kirtikar) यावेळी म्हणाले. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी; गर्दी मराठी भाषेवरच्या अन्यायाविरोधातील, वरळीतल्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची

8 Hour Sleep: शरीराला ८ तासाच्या झोपेची आवश्यकता का आहे? वाचा महत्वाचे कारण

Maharashtra Politics: ठाकरे नडणार, महायुतीला भिडणार? राज-उद्धव ठाकरेंची युती बदलणार सत्तेचं गणित?

SCROLL FOR NEXT