Chhagan Bhujbal News: 'मागच्या दाराने आरक्षण देऊन ओबीसींवर अन्याय...' सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास भुजबळांचा थेट विरोध

Chhagan Bhujbal On Maratha Reservation: मराठा समाजाला मागच्या दाराने आरक्षण देऊन ओबीसींवरती अन्याय होत असल्याची भावना छगन भुजबळ यांनी व्यक्त केली.
chhagan bhujbal
chhagan bhujbal Saam tv
Published On

Chhagan Bhujbal News:

राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. मनोज जरांगे यांनी मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे, अशी मागणी केली असून त्याला ओबीसी समाजाचा विरोध आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा ओबीसीमधून मराठा आरक्षणाला विरोध दर्शवला असून 17 हा ओबीसी समाजावर अन्याय असल्याचे त्यांनी म्हणले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आज बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत. दौऱ्यावेळी अंतरवाली फाट्यावरील वडिगोद्रीमध्ये माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ओबीसीमधून मराठा समाजाला (Maratha Reservation) सरसकट आरक्षण देण्यास जाहीरपणे विरोध दर्शवला.

काय म्हणाले छगन भुजबळ?

"मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमचा विरोध नसून ओबीसीमधून सरसकट देण्यास आमचा विरोध आहे. मराठा समाजाला मागच्या दाराने आरक्षण देऊन ओबीसींवरती अन्याय होत असल्याची भावना छगन भुजबळ यांनी व्यक्त केली. तसेच मराठा समाज गरीब आहे, मात्र आरक्षण हे काही गरिबी हटावचा कार्यक्रम नाही," असेही छगन भुजबळ यावेळी म्हणाले.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

chhagan bhujbal
Delhi Pollution: राजधानी दिल्लीत प्रदूषणाचा कहर; केजरीवाल सरकारने घेतला मोठा निर्णय

तसेच "त्यांनी आधी सांगितले की निजाम काळात काही मागासलेल्या लोकांच्या कुणबी नोंदी आहेत. म्हणून मी ज्यांच्या कुणबी नोदी आहेत, त्यांना आरक्षण द्या असे म्हणलो. मात्र ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांनाही मागच्या दाराने आत घेण्याचा हा डाव आहे. सर्वांना सरसकट ओबीसीमध्ये येण्याचा घाट घातला आहे, त्याला तुम्ही विरोध केला पाहिजे असे म्हणत ओबीसी समर्थकांना १७ तारखेला होणाऱ्या सभेसाठी येण्याचे आवाहनही भुजबळांनी केले. (Latest Marathi News)

chhagan bhujbal
Nana Patole Criticized BJP: भाजप हा खोटारडा पक्ष, खरा चेहरा समोर आला; नाना पटोलेंची टीका

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com