Uddhav Thackeray News Saam TV
महाराष्ट्र

Uddhav Thackeray News: 'शिवसेनेत चुकीला माफी आहे; पण पापाला नाही..' उद्धव ठाकरेंचे शिंदे गटावर टीकास्त्र

Maharashtra Politics: आज मातोश्रीवर शिर्डीचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला.

सुरज सावंत

Uddhav Thackeray News: एकनाथ शिंदेंच्या (EKnath Shinde) बंडाने शिवसेनेत भगदाड पडले असले तरी उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) नेतृत्वाखाली मोठे पक्षप्रवेशही होत आहेत. आज मातोश्रीवर शिर्डीचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर तोफ डागली.. (Maharashtra Politics)

माजी खासदाराची गृहवापसी...

याबाबत सविस्तर माहिती अशी की, शिवसेनेचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे पुन्हा स्वगृही परतले. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. भाऊसाहेब वाकचौरे यांच्या पक्षप्रवेशाने शिवसेना ठाकरे गटाचा गड आणखी भक्कम झाला आहे. या पक्षप्रवेशावेळी उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर निशाणा साधला.

काय म्हणाले उद्धव ठाकरे....?

"वाकचौरेंनी त्यांच्याकडून चूक झाल्याचे सांगत माफी मागितली. मात्र वाकचौरेंनी माफी मागायची गरज नाही. शिवसैनिक चुकीला माफी देतो, पापाला माफी देत नाही. शिवसेनेचा आवाज दिल्लीचे तक्त हालवल्याशिवाय राहणार नाही. राजकारणात श्रद्धा व सबुरी हवी मात्र आता जे दिल्लीत बसलेत त्यांना सबुरी अजिबात नाही..." असा हल्लाबोल ठाकरेंनी केला

तसेच यावेळी पुढे बोलताना "मी आता ज्यावेळी शिर्डीत येईन तेव्हा साईबाबांचे दर्शन तर घेईनच पण सभा ही घेईन असे म्हणत माझं त्या गद्दारांना आव्हान आहे. निवडणुकीला सामोर जा.. असा थेट इशाराही ठाकरेंनी यावेळी दिला. तसेच शिवसेनेत चुकीला माफी आहे, पण पापाला माफी नाही.. " असेही ते यावेळी म्हणाले. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Bhasha Vijaya Divas: 'एकत्र आलो आहोत, एकत्र राहण्यासाठीत, आता आम्ही दोघं मिळून तुम्हाला फेकून देणार'; उद्धव ठाकरेंकडून युतीचे संकेत

Raj thackeray: आम्ही शांत आहोत, म्हणजे आम्ही #$@डू आहोत असा गैरसमज नको, राज ठाकरे कडाडले

Marathi bhasha Vijay Live Updates : तुमच्याकडे न्याय मिळत नसेल तर गुंडगिरी करू, ठाकरेंचा फडणवीसांना टोला

Garja Maharashtra Maza : ठाकरेंच्या मेळाव्याची गर्जा महाराष्ट्र गीताने सुरूवात | VIDEO

Rava Puri Recipe : टिफीनमध्ये रोज चपाती कशाला? झटपट करा कुरकुरीत बटाटा पुरीचा नाश्ता

SCROLL FOR NEXT