Maharashtra political defections latest news saam tv
महाराष्ट्र

खासदारांची फोडाफाडी का होतेय? माजी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पडद्यामागील राजकारण

Maharashtra Politics: माजी मुख्यमंत्र्यांनी ऑपरेशन टायगरवरून मोठा राजकीय रणनीतीचा खुलासा केला आहे. खासदारांच्या फोडाफाडी मागे कोण आहे, याचाही उलगडा त्यांनी केला आहे.

Bharat Jadhav

  • ऑपरेशन टायगरमुळे राजकीय वातावरण तापलं आहे.

  • माजी मुख्यमंत्र्यांनी फोडाफोडीमागील मोठा खुलासा केला.

  • राज्यातील राजकीय समीकरणे झपाट्याने बदलत आहेत.

राज्यात सुरू असलेल्या ऑपरेशन टायगरवरुन राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या राजकीय घडामोडीवरून राजकीय नेते प्रतिक्रिया देत आहेत. सत्ताधारी शिवसेना पक्षाच्या नेत्यांकडून समर्थन केलं जातंय तर विरोधी पक्षाकडून टीका केली जातेय. ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊतांनी या घडामोडीवर प्रतिक्रिया देताना लोकशाही संपत असल्याची म्हटलंय. तसेच फुटीर खासदारांना गंभीर इशारा दिलाय.

दरम्यान राज्यात होणाऱ्या अशा आमदार-खासदारांच्या फोडाफोडीमागे राजकारण काय आहे, पडद्यामागे नेमकं काय चाललंय याबाबत माजी मुख्यमंत्र्यांनी मोठा खुलासा केला आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पक्ष फोडाफोडी आणि शिवसेना ठाकरे गटातील सहा खासदारांच्या स्वतंत्र गट स्थापनेवर भाष्य केलंय. देशात हुकूमशाही आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. लोकशाहीसाठी आजचा दिवस काळा असल्याची टीकाही त्यांनी केली. कराडमध्ये माध्यमांशी बोलताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपवर विरोधी पक्ष फोडण्याचा आरोप केलाय.

शिवसेना उद्धव ठाकरे गटातील सहा खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र दिल्याने पक्षात फूट पडल्याच्या चर्चा सुरू आहेत. तसेच केंद्र सरकार 'डी लिमिटेशन' (मतदारसंघ पुनर्रचना) विधेयकाच्या माध्यमातून उत्तर भारतीय राज्यांचे वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. महिला आरक्षणाच्या नावाखाली संविधान बदलण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही चव्हाण म्हणालेत.

देशातहुकूमशाही आणण्याचा प्रयत्न सुरू असून लोकशाहीसाठी हा काळा दिवस आहे. “लोटस, टायगर, लायन ती काय मला जनावरांची नावं माहिती नाहीत, पण शिवसेना उद्धव ठाकरे गटात विभाजन झाल्याच्या बातम्या ऐकू येत आहेत. शिवसेनेच्या नऊपैकी सहा खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र दिलंय. त्यामुळे पक्षात फूट पडलीय.

नरेंद्र मोदी डी लिमिटेशन विधेयकात बदल करून उत्तर भारतीय राज्यांचं वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. महिला आरक्षणाच्या नावाखाली देशाचं संविधान बदलण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. एका बाजूला प्रचंड आर्थिक राजकारण आणि दुसऱ्या बाजूला ईडीची भीती, या दुहेरी कचाट्यात राजकारण करणं कठीण झाले आहे. तुम्ही पक्षात आलात तर खोके मिळतील, कॉन्ट्रॅक्ट मिळतील आणि त्यातून चाळीस टक्के कमिशन खा, असं भ्रष्ट राजकारण सुरू असल्याचं चव्हाण म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT