Eknath Shinde Sanjay Shirsat Latest News :  Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Politics : संजय शिरसाट अडचणीत, मंत्रिपद धोक्यात आल्याची चर्चा, भाजपच्या नाराजीनंतर शिंदे मोठा निर्णय घेणार?

Sanjay Shirsat minister post controversy : अभिजीत दिपके यांच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर मंत्री संजय शिरसाट यांच्या अडचणी वाढल्याची चर्चा आहे. भाजपच्या नाराजीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Namdeo Kumbhar

Eknath Shinde Sanjay Shirsat Latest News : आंदोलक अभिजीत दिपके यांच्या कुटुंबियांची भेट घेतल्यामुळे शिवसेनेचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. या भेटीमुळे महायुती सरकारमध्ये नाराजी आहे. विशेषतः भाजपमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, संजय शिरसाट यांचे मंत्रिपद धोक्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

कॅबिनेट बैठकीत उपमुख्यमंत्र्यांची नाराजी

मिळालेल्या माहितीनुसार, राज्य सरकारच्या नुकत्याच पार पडलेल्या कॅबिनेट बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणावरून संजय शिरसाट यांच्यावर उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. महायुतीच्या धोरणाविरुद्ध जाऊन ही भेट घेतल्याचे संकेत वरिष्ठ पातळीवरून मिळाले आहेत. संजय शिरसाट यांच्याशिवाय बच्चू कडू यांनीही दिपकेंची भेट घेतली होती. दिपकेंच्या आंदोलनामुळे शिक्षणमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला होता. तुम्ही त्यांचीच भेट घेतली? असा नाराजीचा सूर असल्याचे समजतेय.

बावनकुळे यांची कडक कारवाईची मागणी

अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वात नुकतेच दिल्लीत आंदोलन पार पडले होते. या आंदोलनानंतर मंत्री संजय शिरसाट यांनी थेट दिपके यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली होती. शिरसाट यांच्या या पाऊलामुळे भाजपच्या गोटात तीव्र असंतोष निर्माण झाला. भाजपचे दिग्गज नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर आक्रमक भूमिका घेत नाराजी व्यक्त केली. अशा नेत्यांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कडक कारवाई करावी, अशी उघड मागणी त्यांनी केली होती.

भाजपच्या या आक्रमक भूमिकेनंतर आणि वरिष्ठांच्या नाराजीनंतर आता संजय शिरसाट यांच्यावर शिंदे काय कारवाई करणार का? त्यांचे मंत्रिपद धोक्यात येणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मंत्रालय परिसरात झाडाची फांदी पडून पोलीस कॉन्स्टेबल जखमी

Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०'च्या ३ सदस्यांवर एलिमिनेशनची टांगती तलवार, 'वीकेंड का वार'ला कोण जाणार घराबाहेर?

Aadhaar Card Update : आधार कार्डधारकांसाठी मोठी बातमी! UIDAIने बदलली Face Authenticationची पद्धत, असा होणार फायदा

Gold Rate : गणेशोत्सवात सोनं खरेदीदारांना दिलासा! १० तोळे ९२०० रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 22k, 24k, 18k चे आजचे ताजे दर

Chocolate Modak vs Mawa Modak: चॉकलेट मोदक की मावा मोदक? यंदाच्या गणेशोत्सवात लहान मुलांसाठी बनवा हे दोन्ही मोदक

SCROLL FOR NEXT