Eknath Khadse Reply To Raksha Khadse saam tv
महाराष्ट्र

Eknath Khadse News: अखेर ठरलं! रावेरमध्ये खडसे विरुद्ध खडसे लढत होणार का? एकनाथ खडसेंनी स्पष्टचं सांगितलं

Maharashtra Politics: रावेर लोकसभा मतदार संघात महायुतीकडून रक्षा खडसे यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे हा मतदार संघ शरद पवार यांच्या वाट्याला आला असून या मतदार संघात कोणता उमेदवार द्यायचा यासंदर्भातही महत्वाची बैठक होती.

Gangappa Pujari

Raver Loksabha Election 2024:

जळगावच्या रावेरमधून महायुतीकडून भाजपच्या रक्षा खडसे पुन्हा लोकसभेच्या रिंगणात उतरल्या आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीकडून एकनाथ खडसे किंवा रक्षा खडसेंच्या भावजय रोहिणी खडसे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात होत होती. मात्र आता रावेरमध्ये खडसेंविरुद्ध खडसे अशी लढत होणार असल्याचे खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले आहे.

रावेर लोकसभा मतदार (Raver Loksabha) संघाची आढावा बैठक आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थित पार पडली. रावेर लोकसभा मतदार संघात महायुतीकडून रक्षा खडसे यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे हा मतदार संघ राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वाट्याला आला असून या मतदार संघात कोणता उमेदवार द्यायचा यासंदर्भात ही महत्वाची बैठक होती.

या बैठकीसाठी एकनाथ खडसे (Eknath Khadse), रोहिणी खडसे, माजी आमदार संतोष चौधरी, रवींद्र पाटील उपस्थित होते. या बैठकीनंतर एकनाथ खडसे यांनी माध्यमांशी बोलताना रावेरमध्ये खडसेविरुद्ध खडसे लढत होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

काय म्हणाले एकनाथ खडसे?

"रावेरमध्ये खडसे विरुद्ध खडसे लढाई होणार नाही. मी प्रकृतीच्या कारणास्तव निवडणूक लढणार नाही. तसेच रोहिणी खडसे यांनी विधानसभा लढवली होती, त्यामुळे त्याही उमेदवार नसणार आहेत. आम्ही सात - आठ इच्छुकांची छाननी केली आहे, "त्यातून एक जण उमेदवार राहिलं, असे एकनाथ खडसे म्हणाले. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरेंकडून युतीचे संकेत

विजयी मेळाव्याला या मराठी कलाकारांची हजेरी, Photo पाहा

Marathi Vijay Melava: संपूर्ण लाईट बंद... इकडून उद्धव, तिकडून राज, ठाकरे बंधूंची ग्रँड एंट्रीने वरळी डोम दणाणला|VIDEO

Raj-Uddhav Thackeray Video: सुवर्णक्षण! खणखणीत भाषनानंतर राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंना टाळी, दोघेही खळखळून हसले, पाहा video

Rice Cooking Tips: भात पातेल्यात शिजवावा की कुकरमध्ये? वाचा फायदे-तोटे

SCROLL FOR NEXT