BJP Leaders Saam
महाराष्ट्र

BJP Leader: '१०० एकर जमीन वडिलोपार्जित, ती माझी नाही'; गिरीश महाजनांच्या आरोपांवर खडसेंचं स्पष्टीकरण

Maharashtra Politics: राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा एकनाथ खडसे विरुद्ध गिरीश महाजन असा जुना वाद पेटला आहे. मंत्री गिरीश महाजन यांच्या टीकेनंतर आता खडसेंनीही जोरदार प्रतिउत्तर दिलं आहे.

Bhagyashree Kamble

राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा एकनाथ खडसे विरुद्ध गिरीश महाजन असा जुना वाद पेटला आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी केलेल्या टोलेबाज वक्तव्यानंतर, एकनाथ खडसेंनीही त्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे. “माझ्या घरात केंद्रीय मंत्री आहेत, मला कोणाच्या पाया पडायची गरज नाही,” असं सांगत खडसेंनी महाजनांवर गंभीर आरोपांची मालिका सुरू केली

ईडीची कारवाई कधीच थांबली असती

गिरीश महाजनांनी अलीकडेच म्हटलं होतं की, “संपूर्ण जगाने पाहिलं की खडसे दिल्लीला जाऊन लोटांगण घालून माफी मागून परतले.” या वक्तव्यानंतर एकनाथ खडसे यांनी प्रत्युत्तर देत स्पष्ट केलं, “मी कधीही दिल्लीला जाऊन लोटांगण घातलं नाही. जर लोटांगण घातलं असतं, तर माझ्यावरची ईडीची कारवाई कधीच थांबली असती.” असं खडसे म्हणाले.

मुरूम चोरीचा आरोप खोटा

“मी कुठल्याही मुरूम चोरीच्या प्रकरणात सामील नव्हतो. गिरीश महाजन यांचीच खोटे गुन्हे दाखल करण्याची प्रवृत्ती आहे. ईडीचा गुन्हाही खोटेपणावर आधारित असून, त्याच्याशी माझा काहीही संबंध नाही. कुणी, कसा आणि का गुन्हा दाखल केला, हे सर्वांना माहिती आहे,” असं खडसेंनी ठामपणे सांगितलं.

वडील शिक्षक, मग एवढी संपत्ती कुठून?

खडसेंनी महाजनांच्या संपत्तीबाबतही प्रश्न उपस्थित करत म्हटलं, “गिरीश महाजन यांचे वडील शिक्षक होते. मग पुणे, मुंबई, जामनेर यांसारख्या ठिकाणी कोट्यवधींची मालमत्ता कशी आली? याची चौकशी ‘अँटी करप्शन ब्युरो’मार्फत करावी,” अशी मागणी त्यांनी केली.

तसेच “महाजन हे मूळ मुद्द्यावरून लक्ष हटवण्याचा प्रयत्न करत आहेत. महामार्ग प्रकरणातील जी जमीन आहे, ती मी घेतलेली नाही. ती माझी वडिलोपार्जित जमीन आहे. मी त्यांना १०० एकर जमिनीचे उतारे दाखवू शकतो.” असं खडसेंनी स्पष्ट केलं.

यासह गिरीश महाजन यांनी कमावलेल्या कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेची यादी लवकरच मुख्यमंत्र्यांकडे सादर करणार असल्याचं खडसे म्हणाले.

महाजनांना मीच वाचवलं होतं”

“गिरीश महाजन हे माझा बोट धरून मोठे झाले, हे सगळ्या जगाला माहिती आहे. अर्धापूरमधील बंदुकीच्या प्रकरणात, अनेक गुन्ह्यांत मीच त्यांना वाचवलं होतं. आता तेच माझ्यावर खोटे आरोप करत आहेत.” असं एकनाथ खडसे म्हणाले.

“माझ्या कुटुंबाचं वाटोळं करण्याचा डाव होता”

शेवटी खडसे म्हणाले, “माझ्या कुटुंबाचं राजकीय आणि सामाजिक वाटोळं करण्याचा प्रयत्न या लोकांनी केला. पण मी आजही ताठ मानेने उभा आहे. माझ्या वरिष्ठांशी आजही चांगले संबंध आहेत. त्यामुळे मला लोटांगण घालण्याची कोणतीही गरज नाही.” असं खडसेंनी स्पष्ट केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Accident: देवदर्शनावरून घरी परतताना काळाचा घाला; मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीचा अपघात, बापलेकीचा मृत्यू

Leopard Attack: मैत्रीला जागला...! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, श्वानाच्या निडर मैत्रीसमोर बिबट्याची माघार Video Viral

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

Vanraj Andekar Case: तोच महिना अन् आंदेकर टोळीने नाना पेठेतच आयुषचा गेम केला, पुण्यात रक्तरंजित थरार

HIV: एचआयव्हीच्या रुग्णांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत?

SCROLL FOR NEXT