Growing discontent among party workers sparks tension in Sharad Pawar-led NCP faction. saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: 'पक्षाकडून आमचा विचार होत नाही'; ठाकरे गटानंतर आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीतही नाराजीचा सूर

NCP Kolhapur : अजित पवार गटानंतर आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटातही नाराजी सूर उमटत आहे. पक्षाचे कार्यकर्ते नेतृत्वाबाबत प्रश्न करत आहेत.

Bharat Jadhav

  • राष्ट्रवादी शरद पवार गटात नाराजी वाढली

  • कार्यकर्त्यांकडून दुर्लक्ष केल्याची तक्रार

  • कोल्हापूरमध्ये नाराजी व्यक्त

ठाकरे गटानंतर आता शरद पवार गटातही नाराजीचा सूर उठू लागलाय. उद्धव ठाकरे भेटत नाहीत आणि आदित्य ठाकरे फिरत नाहीत, अशी तक्रार करत नाराजीचा सूर ठाकरे गटातील नेत्यांनी आवळला होता. दरम्यान तक्रारींचा पाढा वाचणाऱ्या नेत्यांना पक्षप्रमुख यांनी चांगलेच सुनावले. ठाकरे गटानंतर आता शरद पवार गटात नाराजी उफाळून येत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांची कोणतीच दखल पक्षाकडून घेतली जात नसल्याच्या तक्रारी पक्षातील नेते करत आहेत. त्यांनी आपली तक्रार थेट प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांना सांगितली आहे. कोल्हापूरमधील राष्ट्रवादी पक्षातील नेत्यांनी अंतर्गत नाराजी राज्य अध्यक्षांना बोलून दाखवली आहे. पद्मजा तिवले यांनी पदाची अपेक्षा न करता पक्ष स्थापनेपासून काम करतो आहोत, परंतु प्रत्येक वेळेला पक्ष आमचा विचार करत नसल्याची खंत बोलून दाखविली आहे.

पक्षाकडून सहकार्य मिळत नाही, आमचा विचार केला जात नाही, अशा तक्रारी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याकडे केल्या आहेत. शहराध्यक्ष आर.के.पोवार यांनी नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीचा अहवाल सादर केला. पक्षाकडून कोणतेही सहकार्य मिळाले नाही. दरम्यान प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी प्रत्येक जिल्ह्याला निरीक्षक नियुक्त केले आहेत.

त्या निरीक्षकांना जिल्ह्याला भेट देऊन अहवाल सादर करण्यास सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे निरीक्षक, प्रदेश प्रवक्ते विकास लवांडे रविवारी कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. लवांडे यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील कार्यकर्त्याची बैठक घेतली. यावेळी बोलताना लवांडे यांनी पुन्हा एकदा जोमाने कामाला लागा. उत्तर किंवा दक्षिण मतदारसंघावर लक्ष केंद्रीत करून काम करा’, अशी सूचना दिल्या. दोन पक्ष एकत्र करण्याच्या प्रक्रियेमुळे थोडा गोंधळ झाला आहे. आता अजित पवार नाहीत, त्यामुळे पक्ष एकत्रित करण्याचा प्रश्नच येत नसल्याचं प्रदेश प्रवक्ते विकास लवांडे म्हणालेत.

अजित पवार गटातही नाराजीचा सूर

अजित पवार यांचे निधन झाल्यापासून पक्षातील आधारवड गेला आहे. त्यामुळे पक्षातील नेते एकमेकांना आधार देत आहेत. परंतु नेत्यांच्या हक्कासाठी बोलण्यासाठी, त्यांची काळजी घेण्यासाठी पक्षात कोणीही कर्ता नेता नसल्याचं खतं पुण्यातील राष्ट्रवादी नेत्यांनी बोलून दाखवली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आरक्षणाचे संरक्षण व्हावं, शिक्षण प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावं : सलीम सारंग

साकीनाका दुर्घटना प्रकरण; मुंबईकर जीवानं गेला, आमदार म्हणतात कट केला

Badlapur accident: मुलासोबत टिटवाळा गणपती दर्शनाला गेली, परतताना खड्ड्यात दुचाकी आदळली; भीषण अपघातात आईचा मृत्यू

Sakinaka Manhole: बीएमसीचे अधिकारी, मुंबईकरांचे मारेकरी? अधिकाऱ्यांना घरी पाठवा

Friday Horoscope: कामात संधी, प्रेमाची कबूली; या ६ राशीच्या लोकांना मिळणार गुड न्यूज, वाचा शुक्रवारचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT