Shinde Group MLA Call Uddhav Thackeray  mid day
महाराष्ट्र

Maharashtra Politics: नाराज आमदार उद्धव ठाकरेंकडे परतणार? बंडखोरांना मातोश्रीची दारं खुली?

Shinde Group MLa : महाराष्ट्रातील सत्तास्थापनेनंतर नुकतंच महायुती सरकारमधील मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला. मंत्रिपदासाठी इच्छूक असलेल्या अनेक आमदारांना मंत्रिमंडळ विस्तारात डावलण्यात आलंय. हेच नाराज आमदार संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असल्याचा मोठा दावा उद्धव ठाकरेंनी केलाय..त्यावरुन अनेक तर्कवितर्कांना उधाण आलंय..

Tanmay Tillu

महाराष्ट्रातील सत्तास्थापनेनंतर नुकतंच महायुती सरकारमधील मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला. यावेळी महायुतीच्या 39 मंत्र्यांनी शपथ घेतली. मंत्रिपदासाठी इच्छूक असलेल्या अनेक आमदारांना मंत्रिमंडळ विस्तारात डावलण्यात आलंय. शिंदे गटात तर नाराजीचा महापूर आल्याचं पाहायला मिळतंय.. हेच नाराज आमदार संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असल्याचा मोठा दावा उद्धव ठाकरेंनी केलाय.

त्यामुळे मोठी खळबळ उडालीय. तर ठाकरेंनी संपर्क करणाऱ्या आमदारांची नावं सांगण्याचं आव्हान शिंदे गटानं दिलंय. शिंदे गटात मंत्रिपदावरून कोण-कोणते आमदार नाराज आहे ते पाहूयात.

शिंदे सेनेतील नाराज आमदार

तानाजी सावंत,आमदार,परांडा

नरेंद्र भोंडेकर,आमदार,भंडारा

विजय शिवतारे,आमदार,पुरंदर

प्रकाश सुर्वे, आमदार, मागाठाणे,

दीपक केसरकर,आमदार,सावंतवाडी

अब्दुल सत्तार,आमदार,सिल्लोड

राजेंद्र गावित,आमदार,पालघर

महायुतीच्या महाविस्तारानंतर भाजपसह दोन्ही मित्रपक्षात नारांजांची मांदियाळी दिसतेय...दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी केलेल्या दाव्यामुळे पुन्हा राजकीय समीकरणं बदलणार का याची चर्चा सुरू झालीय. विधानसभेत सपाटून मार खाल्लेल्या ठाकरेंच्या शिवसेनेनं आता हिंदूत्वाची कास पुन्हा हाती घेतलीय. त्यामुळे ठाकरे मविआतून बाहेर पडून पुन्हा पक्षबांधणी करणार आणि सोडून गेलेले नाराज आमदार पुन्हा मातोश्रीवर परतणार का याकडे लक्ष आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

T20 World Cup 2026: सेमीफायनलची दारं उघडी ठेवण्यासाठी भारतासमोर NRRचं गणित, झिम्बाब्वेविरुद्ध विजयाचं स्पष्ट समीकरण पाहा

Chandrapur Crime : चंद्रपूरमध्ये हत्येचा थरार! भावाने सख्ख्या बहिणीला संपवलं, हल्ल्यात आईसुद्धा गंभीर जखमी

Kidney Failure Symptoms: किडनी निकामी होण्याआधी हे ३ गंभीर आजार देतात अलर्ट; तज्ज्ञांनी सांगितली नेमकी कारणं, वेळीच व्हा सावध

Maharashtra Live News Update: अहिल्यानगर शहरावर पाणी संकट

Bank Account: जुनं बँक अकाउंट वापरत नाही? आजच करा हे काम अन्यथा खिशाला बसेल फटका

SCROLL FOR NEXT