Maharashtra Politics Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : फडणवीसांचे शिंदेंना धक्क्यांवर धक्के? शिंदेंनी मंजूर केलेले आणखी एक टेंडर रद्द, फडणवीस सरकारमध्ये टेंडर वॉर?

Mahayuti Politics : मुख्यमंत्री देवेंद्र् फडणवीसांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना तिसरा धक्का दिलाय. नेमका हा धक्का काय आहे? शिंदेंनी मंजूर केलेलं नेमकं कोणतं टेंडर फडणवीसांना रद्द केलंय. त्यावरचा हा विशेष रिपोर्ट.

Jyoti Shinde

Maharashtra Political News : eगळ्यात गळे घालून सत्येत आलेल्या महायुतीत सध्या पायात पाय घालून एकमेकांना पाडण्याचा प्रयत्न होतोय... याचं मुळ कारण म्हणजे महायुतीत रंगलेलं टेंडर वॉर... माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मंजुरी दिलेल्या टेंडरला मुख्यमंत्री फडणवीसांनी ब्रेक लावलाय... मुंबई आणि जालन्यातल्या प्रकल्पांनंतर आता पंढरपुरच्या दर्शन मंडप आणि स्काय वॉकचंदेखील टेंडर फडणवीसांनी रद्द केलंय. त्यामुळे शिंदेंना फडणवीसांनी हा तिसरा धक्का दिल्याची चर्चा रंगलीय.

पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी दर्शन मंडप आणि स्काय वॉक बंधण्यात येणार होतं.. यासाठी तक्तालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी 229 कोटींचा निधी मंजूर केला होता.. मात्र याच टेंडरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्थगिती दिलीय... त्यामुळं महायुतीत सर्व काही आलबेल नसल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत..

शिंदे मुख्यमंत्री असताना मंजूर केलेल्या कोणत्या प्रकल्पांना फ़डणवीसांनी स्थगिती देऊन चौकशी लावली आहे ते पाहूयात..

फडणवीसांचे शिंदेंना धक्क्यांवर धक्के?

- जालन्यातील 900 कोटींच्या सिडको प्रकल्पाचं टेंडर रद्द करून चौकशीचे आदेश

- मुंबई महापालिकेतील घनकचरा व्यवस्थापनाच्या 1400 कोटींच्या टेंडरला स्थगिती

- पंढरपुरातील दर्शन मंडप आणि स्काय वॉक बांधकामांच्या 229 कोटींचं टेंडर रद्द

फडणवीसांच्या या निर्णयामुळे विरोधकांना आयतं कोलीत मिळालंय. यामुळे मात्र महायुतीत सारंकाही आलबेल नसल्याचं दिसतंय...कारण पालकमंत्रिपदाचा वाद अजूनही निवळलेला नसताना शिंदेंच्या काळात मंजूर केलेल्या प्रकल्पांना फडणवीसांनी स्थगिती देत चौकशी लावल्यामुळे भविष्यात महायुतीतला अंतर्गत संघर्ष आणखीन वाढणार की शिंदे फडणवीसांशी जुळवून घेणार याकडे लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची शेवटची आरती संपन्न

ITR Filling: आयटीआर फाइल करण्याची डेडलाइन वाढण्याची शक्यता, आतापर्यंत फक्त ४.५६ कोटी करदात्यांनी केलाय अर्ज

Ganesh Visarjan 2025: बाप्पाच्या विसर्जनाची मिरवणूकीत पायांची काळजी कशी घ्याल? हे उपाय करतील तुमची मदत

Baaghi 4 OTT Release : जबरदस्त ॲक्शन अन् रोमान्सचा धमाका, टायगर श्रॉफचा 'बागी ४' कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर येणार?

Ganpati Visarjan : पुण्यात गणपती विसर्जनावेळी दुर्घटना, मिरवणुकीदरम्यान दोन जणांना विजेचा शॉक

SCROLL FOR NEXT