Shiv Sena leader Gulabrao Patil making a strong statement on seat-sharing in Maharashtra elections. saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: भाजप १०० जागा लढेल तर आम्ही ५० पण...; जागावाटपावर शिवसेना नेत्याचं मोठं वक्तव्य

Mahayuti Alliance: शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी महायुतीच्या जागावाटप सूत्रावर भाष्य केलंय. जर भाजप १०० जागा लढवत असेल तर आम्ही ५० जागा लढवू. असं विधान केल्यानं राजकीय आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू होतील.

Bharat Jadhav

  • आगामी महाराष्ट्र निवडणुकांवर महायुतीत अनिश्चितता कायम आहे.

  • भाजप १०० जागांवर लढेल तर शिवसेना ५०वर लढेल, गुलाबराव पाटील यांचं विधान.

  • युती तुटल्यास कार्यकर्त्यांचे नुकसान होईल, अशी भीती शिवसेनेच्या मंत्र्यांनी व्यक्त केलीय.

संजय महाजन, साम प्रतिनिधी

राज्यातील आगामी निवडणुका महायुती एकत्र लढणार की स्वतंत्रपणे लढणार प्रश्न तिन्ही पक्षातील कार्यकर्त्यांना पडलाय. कारण विविध ठिकाणी तिन्ही पक्षांकडून स्वबळाचा नारा दिलाय. तर काही ठिकाणी महायुती एकत्रच निवडणुकांना सामोरे जाणर आहे. मात्र स्वबळाच्या घोषणेवरून काही आमदारांची चिंता वाढलीय. जर युती तुटली तर कार्यकर्त्यांचे मोठे नुकसान होईल, असं शिवसेना आमदार गुलाबराव पाटील म्हणालेत. ते जळगावमध्ये पत्रकारांशी बोलत होते, त्यावेळी त्यांनी हे विधान केलंय.

दरम्यान महायुतीमधील तिन्ही पक्षांनी जेथे जमेल तेथे युती नाहीतर स्वबळाची शक्ती दाखवायची असं ठरवलंय. मुंबई, ठाणे या ठिकाणी शिंदे गट; पुणे, पिंपरी चिंचवड येथे अजित पवार गट स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे. तर राज्यातील इतर महानगरपालिकेत तेथील परिस्थिती पाहून युतीबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचं तिन्ही पक्षाच्या नेत्यांकडून सांगण्यात आलंय. मात्र यामुळे काही आमदारांची आणि तेथील स्थानिक नेत्यांची चिंता वाढवलीय. जळगावमधील शिवेसना आमदार गुलाबराव पाटील यांनाही युतीबाबत चिंता लागलीय.

भाजप एकीकडे युतीबाबत बोलते, तर दुसरीकडे एकांतात स्वबळावर निवडणुका लढवण्याची भाषा करते. युती न झाल्यास कार्यकर्त्यांचे मोठे नुकसान होईल, ते "मरून जातील," असा सूचक इशाराही गुलाबराव पाटील यांनी दिला. त्यामुळे भाजपाने कार्यकर्त्यांच्या भवितव्यासाठी युती करावी. जर भाजप शंभर जागा लढेल तिथे आम्ही आमच्या ताकतीनुसार ५० जागा तर लढू पण युती तोडू नका अशी साद मंत्री गुलाबराव पाटलांनी भाजपला घातलीय.

लोकसभा विधानसभेला कार्यकर्ता काम करतो, त्यामुळे दोन-चार जागा इकडे तिकडे करा पण कार्यकर्त्याला मोठं करण्याची हीच निवडणूक असते. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही भूमिका मांडली. ते पुढे म्हणाले की, लोक आता हुशार झाले आहेत. पहिल्यांदा निवडून येणं सोपं असतं, पण सलग तीन-चार वेळा निवडून येणारा नेता खरा असतो. शिवसेनेचं नुकसान संजय राऊत या एकट्या माणसामुळे झालं, अशी टीकाही त्यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pandharpur Accident: भुजबळ वस्तीजवळ कार आणि दुचाकीचा भीषण अपघात; दोन्ही वाहनांचा चक्काचूर

Phone: चुकूनही फोन १०० टक्के चार्ज करु नका, अन्यथा...

Maharashtra Live News Update: हातात कोयता घेऊन तरुणाचा दहशत माजवण्याचा प्रयत्न; व्हिडिओ व्हायरल

DRI मुंबईची भव्य कारवाई; २३ कोटींचा ई-कचरा जप्त, मास्टरमाईंड अटक

Indian Railway: भारतातील एक असं रेल्वे स्टेशन, येथून देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यासाठी ट्रेन जातात

SCROLL FOR NEXT