हा फोटो छावा चित्रपटातला आहे. प्रातिनिधीक फोटो म्हणून याचा वापर करण्यात आला आहे.  x (Twitter)
महाराष्ट्र

Maharashtra Politics : औरंगजेब क्रूर नव्हता, त्याच्या आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यात धर्माची लढाई नव्हती, आमदाराचं वादग्रस्त विधान

MLA Abu Azmi statement on Aurangzeb: औरंगजेब हा क्रूर नव्हता, तो उत्तम शासक होता. औरंगजेब आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यात धर्माची लढाई नव्हती. तेव्हाची लढाई ही हिंदू-मुसलमान अशी नव्हती असे विधान सपाच्या आमदाराने केले आहे.

Yash Shirke

Maharashtra Political News : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी वाद पाहायला मिळाला. समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता. छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यामध्ये धर्माची लढाई नव्हती.. असे वादग्रस्त वक्तव्य केले. या वक्तव्यावरुन आझमी यांच्यावर कारवाई व्हावी असे आदित्य ठाकरेंनी म्हटले आहे.

अबू आझमी म्हणाले, 'चुकीचा इतिहास दाखवला जात आहे. औरंगजेबाने अनेक मंदिरांची स्थापना केली होती. औरंगजेबाचा सैनिक हा बनारसमधल्या एका तरुणीशी बळजबरी करत होता, तिला लग्न करण्याची जबरदस्ती करत होता. तेव्हा औरंगजेबाने दोन हत्तींच्या मध्ये बांधून त्या सैनिकाची हत्या केली. तेथील पंडितांनी औरंगजेबासाठी मस्जिद बांधून दिली.'

'तुम्ही औरंगजेबाला क्रूर शासक मानता का?' असा प्रश्न अबू आझमी यांना विचारण्यात आला. तेव्हा त्यांनी प्रश्नाचे उत्तर देताना 'मी औरंगजेबाला क्रूर शासक मानत नाही. औरंगजेब हा उत्तम शासक होता. तेव्हाची लढाई राजकीय होती. तेव्हाची लढाई हिंदू-मुसलमान अशी लढाई नव्हती' असे वक्तव्य केले. या वक्तव्यावरुन वाद निर्माण झाला.

अबू आझमी यांच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले, 'अबू आझमी यांनी हे वक्तव्य सुपारी घेऊन करत आहेत. ते वाद निर्माण करायचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्रात वादाची ठिणगी करायचा प्रयत्न करत आहेत. हे मी आधीही सांगितले होते. यावर कारवाई झालीच पाहिजे. महत्त्वाची गोष्ट ही आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात असं वक्तव्य जे कोणी करेल त्यावर कारवाई झालीच पाहिजे. इतिहासात न जाता जे कोणी वादग्रस्त वक्तव्य आहे त्यांच्यावर मुख्यमंत्री काय कारवाई करत आहेत याकडे आमचे लक्ष आहे.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actress : बेडरूम अन् इंटीमेट सीन; कट म्हटलं तरी हिरोला Kiss करत राहिली प्रसिद्ध अभिनेत्री, नेमकं घडलं काय?

Maharashtra News Live Update: महायुतीकडून भाजपाचे अमर राजुरकर यांना उमेदवारी

OBC आरक्षणात कपात होणार? निवडणूक आयोगाचे राज्य सरकारला आदेश, पाहा का घेतला निर्णय?

Vaibhav suryavanshi: 15 वर्षांचा वैभव सूर्यवंशी मालामाल, आलिशान कार आणि मिळाले तब्बल इतके लाख रूपये

Ladki Bahin Yojana : मे महिना संपला; लाडकीच्या खात्यात ₹१५०० कधी येणार? अपडेट आली समोर

SCROLL FOR NEXT