Hundreds of workers joined the Congress in the presence of Harshvardhan Sapkal at Tilak Bhavan. Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: राज्यसभेच्या निवडणुकीदरम्यान काँग्रेसनं टाकला डाव; भाजपच्या अनेक नेत्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Maharashtra Politics: भाजपा, शिवसेना, वंचित बहुजन आघाडी, संभाजी ब्रिगेडसह विविध संघटनांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत टिळक भवन येथे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

Bharat Jadhav

  • राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात राजकीय हालचाली वेगाने सुरू असताना हा प्रवेश झाला.

  • राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचाली वेगाने सुरू.

  • अनेक नेते आणि कार्यकर्त्यांनीकाँग्रेसमध्ये प्रवेश आहे.

काँग्रेसने राज्यातील सत्ताधारी भाजपा, शिवसेना तसेच वंचित बहुजन आघाडीला मोठा धक्का दिला आहे. भाजप आणि शिवसेना इतर पक्षातील नेत्यांना फोडून आपल्या पक्षाची ताकद वाढवत असायचे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्यावेळी तर महाविकास आघाडीच्या पक्षातील स्थानिक पातळीवरील नेत्यांना प्रवेश देत आपले पक्षांची ताकद वाढवली होती.

आता मात्र काँग्रेसनं भाजपला आणि शिवसेनेला जबर धक्का दिला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत टिळक भवन येथे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. भाजप, शिवसेना, वंचित बहुजन आघाडी, संभाजी ब्रिगेडसह विविध संघटनांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला. हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांचे काँग्रेस कुटुंबात स्वागत करून पुढील कामासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी काँग्रेसचे सचिव सचिन सावंत, माजी आमदार अनंत गाडगीळ, राजेश शर्मा, एस. सी. विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तिअंबिरे, प्रदेश सरचिटणीस धनंजय शिंदे, प्रा. प्रकाश सोनावणे आदीजण उपस्थित होते. काँग्रेस पक्षाचा सर्वसमावेशक विचार आणि राहुल गांधी यांचे आश्वासक नेतृत्व यावरचा विश्वास दिवसेंदिवस वाढत चाललाय. काँग्रेसचा विचार हाच देशाचा विचार आहे. आज देशातील धर्मांध शक्तींचा मुकाबला फक्त काँग्रेसच करू शकतो म्हणून विविध विचारांचे, संघटनेचे लोक काँग्रेस पक्षात प्रवेश करत असल्याचं सपकाळ म्हणाले.

काँग्रेसचा विचार हा बहुजनांचा, संविधानाचा, देशाचा, साधू संत, महापुरुषांचा विचार आहे, विश्वशांतीचा, विश्वबंधुत्वाचा विचार आहे. हाच विचार आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे तर दुसऱ्या बाजूला मात्र तोडाफोडा व राज्य करा हा विचार आहे, तो हिंदुत्वाचा विचार नाही तर संधीसाधूचा विचार आहे. एका हातात काँग्रेसचा विचार तर दुसऱ्या हातात कृती घेऊन संघर्षाची भूमिका घ्या. सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी काम करा, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी केले आहे.

राष्ट्रीय सचिव सचिन सावंत यावेळी म्हणाले, भाजपचे खायचे दात व दाखवायचे दात वेगळे आहेत. देशात आज धर्मांध विचाराचे विष पसरवून सामाजिक सलोखा बिघडवण्याचे काम केले जातंय. आर्थिक विषमता वाढत चालली आहे, गरिबांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून सरकार मुठभर लोकांसाठी काम करत आहे. काँग्रेस जनतेपासून वेगळी नाही तर जनतेच्या भावनांशी एकरुप आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

डिझेलसाठी शेतकऱ्याला पाया पडण्याची वेळ; VIDEO व्हायरल

Chanakya Niti: एकटं राहूनही खुश असतात हे लोक, चाणक्यांनी सांगितली ५ कारणं

Maharashtra News Live Update: लातूरच्या RCC क्लासवर शिवसेनेकडून शाही आणि काळ ऑइल फेकलं

प्रवाशांच्या जीवाशी खेळ! इडलीसाठी वापरलं शौचालयाचं पाणी|VIDEO

Gadchiroli : फ्लॅटमध्ये भलताच कारभार सुरू; पोलिसांना कुणकुण, दोन इंजिनिअर भावांना अटक, नागपूर कनेक्शन उघड

SCROLL FOR NEXT